उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे
संपूर्ण देशभरात महाशिवरात्री मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करून अनेक महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवास केल्यामुळे कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात साबुदाणे बनवले जातात. पण उपाशी पोटी साबुदाणे खाल्ल्यामुळे अपचन किंवा ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. उपवास म्हंटल की प्रत्येकाला सगळ्यात आधी साबुदाण्याची आठवण होते. पण कायमच साबुदाणे खाण्याऐवजी इतर वेगवेगळे पदार्थ उपवासाच्या दिवशी बनवावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कच्च्या केळींपासून कुरकुरीत वडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. उपवासाच्या दिवशी कच्च्या केळ्यांचे आवर्जून सेवन केले जाते. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. केळी खाल्ल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया कच्च्या केळीचे वडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा






