कामाच्या तणावापासून सुटका मिळवण्यासाठी घरी बनवा स्पेशल चॉकलेट ड्रिंक
धावपळीच्या जीवनशैलीमुळे कामातून स्वतःला अनेक लोक फार कमी वेळ देतात. यामुळे शरीरात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. नेहमी नेहमी काम करत राहिल्यामुळे शरीर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे थकून जाते. अशावेळी शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला मानसिक तणाव कमी करण्यासाठी चॉकलेट ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. डार्क चॉकलेट खाल्यामुळे शरीरातील तणाव कमी होतो आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स, टॅमिन्स आणि खनिजे इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. चॉकलेट खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळ्वण्यास मदत होते. दैनंदिन आहारात चॉकलेट ड्रिंकचे सेवन केल्यास शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहील आणि तुम्ही दिवसभर आनंदी आणि उत्साही राहाल. चला तर जाणून घेऊया स्पेशल चॉकलेट ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
चॉकलेट ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर चमच्याने दूध सतत ढवळत राहा.
त्यानंतर गरम करून घेतलेल्या दुधात कोकोपावडर टाकून दूध सतत मिक्स करत राहा. यामुळे दूध कढईला चिटकणार नाही.
नंतर त्यात चवीनुसार साखर टाकून व्यवस्थित विरघळवून घ्या. यामुळे चॉकलेट ड्रिंक सुंदर तयार होईल.
सगळ्यात शेवटी तयार केलेल्या चॉकलेट ड्रिंकमध्ये दालचिनी पावडर टाकून मिक्स करून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले स्पेशल चॉकलेट ड्रिंक.