Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणाला बनवा गरमा गरम आणि पोटभरणीचा मसालेदार ‘सोया पुलाव’; वरून घाला तुपाची धार अन् रंगतदार करा मेजवानी

रात्रीच्या जेवणाला काही झटपट, गरमा गरम आणि पोटभरणीचं बनवायचं असेल तर मसालेदार सोया पुलाव तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हा चविष्ट भात फक्त चावीलाच नाही तर आरोग्यासाठीही पौष्टिक ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2025 | 10:00 AM
रात्रीच्या जेवणाला बनवा गरमा गरम आणि पोटभरणीचा मसालेदार 'सोया पुलाव'; वरून घाला तुपाची धार अन् रंगतदार करा मेजवानी

रात्रीच्या जेवणाला बनवा गरमा गरम आणि पोटभरणीचा मसालेदार 'सोया पुलाव'; वरून घाला तुपाची धार अन् रंगतदार करा मेजवानी

Follow Us
Follow Us:

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये पुलावाला एक वेगळेच स्थान आहे. भातावर आधारित हा पदार्थ हलका, झटपट तयार होणारा आणि चविष्ट असल्यामुळे घरगुती जेवणात, डब्यात किंवा खास पाहुण्यांसाठी बनवला जातो. पुलावाची खासियत म्हणजे त्यात वापरलेले विविध मसाले, भाज्या आणि कधी कधी वेगवेगळे प्रोटिनयुक्त घटक. आजकाल आरोग्यदायी आहाराला अधिक महत्त्व दिले जात असल्यामुळे सोयाबीनचा वापर स्वयंपाकात वाढला आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटिन असते आणि ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

इडली- डोसासोबत खाण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा उड्डपीस्टाईल सांबार, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील

सोया पुलाव हा एक पौष्टिक, चविष्ट आणि पोटभर जेवणाचा पर्याय आहे. यात सोयाबीनचे तुकडे, सुगंधी बासमती तांदूळ, मसाले आणि भाज्या घालून बनवला जातो. हा पुलाव केवळ प्रोटिनने समृद्ध नसून चवीलाही अतिशय छान लागतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पुलाव दुपारच्या जेवणात, रात्रीच्या डिनरमध्ये किंवा खास प्रसंगी सहज बनवता येतो.

साहित्य :

  • २ कप बासमती तांदूळ
  • १ कप सोयाबीन तुकडे (पाण्यात भिजवून दाबून पाणी काढलेले)
  • १ मोठा कांदा (स्लाइस केलेला)
  • १ टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • १ गाजर (लांब काप)
  • ½ कप मटार
  • १ शिमला मिरची (चिरलेली)
  • २ चमचे तेल/तूप
  • १ तमालपत्र
  • २ लवंगा
  • २ हिरवी वेलची
  • १ छोटा दालचिनी तुकडा
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • २ हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या)
  • ½ चमचा हळद
  • १ चमचा गरम मसाला / बिर्याणी मसाला
  • मीठ – चवीनुसार
  • ४ कप पाणी
  • कोथिंबीर
Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या प्रसादाला बनवा चविष्ट, पौष्टिक अन् पारंपारिक असं पंचखाद्य; पिढ्यानपिढ्या चालत आलीये रेसिपी

कृती :

  • प्रथम तांदूळ धुऊन २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • सोयाबीनचे तुकडे गरम पाण्यात १० मिनिटे भिजवा, नंतर दाबून त्यातील पाणी काढून बाजूला ठेवा.
  • एका भांड्यात तेल/तूप गरम करून त्यात तमालपत्र, लवंगा, वेलची, दालचिनी घालून फोडणी द्या.
  • आता त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत परता. नंतर आलं-लसूण पेस्ट व हिरव्या मिरच्या घाला.
  • त्यात टोमॅटो, गाजर, मटार व शिमला मिरची घालून थोडा वेळ परता.
  • नंतर सोयाबीन तुकडे घालून मसाल्यात छान परतून घ्या.
  • हळद, गरम मसाला व मीठ घालून चांगले मिसळा.
  • भिजवलेला तांदूळ पाणी काढून त्यात घाला व हलक्या हाताने परता.
  • आता ४ कप गरम पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.
  • पाणी आटेपर्यंत व भात फुलून येईपर्यंत पुलाव शिजवा.
  • तयार झालेला गरमागरम सोया पुलाव वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दही, रायता, पापड किंवा कोशिंबिरीसोबत सर्व्ह करा

FAQs (संबंधित प्रश्न)

सोया पुलाव म्हणजे काय?
सोया पुलाव हा सोया चंक्स आणि तांदूळ वापरून तयार केलेला एक भारतीय डिश आहे. हा एक आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ आहे, ज्यात सोयाबीनमुळे प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

सोया पुलावचे फायदे काय?
सोया चंक्स हे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहेत. हा शरीरात प्रोटीनची कमतरता भरून काढतो.

Web Title: Make a spicy and flavourful masala soya pulao at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • dinner recipe
  • marathi recipe
  • soyabin

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
3

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Recipe : व्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल टेस्टी पनीर बिर्याणी
4

Recipe : व्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल टेस्टी पनीर बिर्याणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.