इडली- डोसासोबत खाण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा उड्डपीस्टाईल सांबार
दक्षिण भारतात बनवले जाणारे पदार्थ जगभरात सगळीकडे खूप प्रसिद्ध आहेत. डोसा, इडली, उत्त्पम, आप्पे, सांबार इत्यादी अनेक पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतात. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर आवडीने मेदुवडा सांबार खाल्ले जाते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक लोक कायमच इडली सांबार किंवामेदुवडा सांबार खातात. पण बऱ्याचदा घरात बनवलेले सांबार हॉटेल सारखे लागत नाही. मसाले आणि सर्व साहित्य वापरून सुद्धा हॉटेलसारखी चव येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उड्डपीस्टाईल सांबार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सांबार तुम्ही डोसा, इडली, मेदुवडा किंवा वाफाळत्या गरमागरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आंबटपणा, गोडपणा, मसालेदार फ्लेवर वरून तयार केलेले सांबार घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया उड्डपीस्टाईल सांबार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी, जिभेवर ठेवताच विरघळेल पदार्थ
सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी