Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poha Jaggery Modak Recipe: बाप्पांसाठी झटपट मोदक! पोहे आणि गुळापासून १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट मोदक

Poha Jaggery Modak Recipe: गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदक हा आवर्जून केला जातो. यंदा नेहमीच्या उकडीच्या, तळणीच्या किंवा खव्याच्या मोदकांपेक्षा पोहे आणि गुळापासून तयार होणारे मऊसूत मोदक नक्की ट्राय करता येतील. ही रेसिपी सोपी असून त्यासाठी जास्त साहित्याचीही गरज नाही.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 11, 2026 | 04:47 PM
Poha Jaggery Modak Recipe: बाप्पांसाठी झटपट मोदक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Poha Jaggery Modak Recipe: बाप्पांसाठी झटपट मोदक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पोहे आणि गुळापासून बनवा मऊसूत आणि चविष्ट मोदक.
  • रेसिपीसाठी लागणारं बहुतांश साहित्य घरातच उपलब्ध.
  • गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी झटपट आणि हटके पर्याय.
 

गणपती बाप्पा आले की घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. नैवेद्य म्हटलं की मोदक हा येतोच. घरात सहसा तळणीचे, उकडीचे किंवा खव्याचे मोदक तयार केले जातात. आता मात्र आपण अजून एका प्रकारचे मोदक आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.आता पोहे आणि गुळापासून तयार करा एकदम मऊसूत मोदक. करायला एकदम सोपो आणि खायला एकच नंबर लागतात. या मोदकाचं खास म्हणजे याला जास्त सामान लागत नाही. आणि चव तर अशी की बाप्पा पण खुश होतील. चला तर मग रेसिपी बघूया.लागणारं सामान काय?हे मोदक करायला बाजारात जायची गरजच नाही. सगळं सामान घरातच असतं. Poha Jaggery Modak Recipe:

साहित्य

  • एक वाटी पोहे
  • एक वाटी दूध
  • पाऊण वाटी गूळ किसलेला
  • एक चमचा साजूक तूप
  • अर्धी वाटी सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड नारळ
  • थोडं मीठ
  • वेलची आणि जायफळ पूड
  • थोडे काजू बदामाचे तुकडे आणि मोदकाचा साचा

कृती

पोहे शिजवून घेणे

सगळ्यात आधी पोहे स्वच्छ करून घ्या. पोह्यात बारीक कचरा असतो तो काढून टाका. दोन तीन वेळा चाळून घ्या. हवं तर एकदा पाण्याने धुवून पण घेऊ शकता.आता एक कढई घ्या, त्यात एक वाटी दूध टाका आणि त्यातच पोहे टाका. गॅस एकदम बारीक ठेवा. मोठा गॅस केला तर दूध लगेच खाली लागेल. दोन तीन मिनिटं हलवत राहा. पोहे दुधात मऊ होतील आणि सगळं दूध पिऊन घेतील. थोडं झाकण ठेवलं तर अजून मऊ होतात. दूध पूर्ण आटलं की गॅस बंद करून टाका.

गूळ मिक्स करणे

पोहे थोडे गार झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात पाऊण वाटी किसलेला गूळ टाका. अख्खा गूळ टाकू नका, किसून टाका म्हणजे पटकन मिक्स होईल. गोड किती हवंय त्यानुसार गूळ कमी जास्त करू शकता.आता मिक्सरमध्ये फिरवून घ्या. एकदम मऊ आणि चिकट असं मिश्रण तयार होईल. यात साखर अजिबात टाकायची नाही. गुळामुळेच छान रंग आणि गोडवा येतो.

नारळ भाजून घेणे

आता परत कढई गॅसवर ठेवा. त्यात एक चमचा तूप टाका. तूप गरम झालं की त्यात अर्धी वाटी नारळ टाका. फक्त दोन मिनिटं परता. जास्त लाल करायचं नाही. तुमच्याकडे डेसिकेटेड नारळ नसेल तर साधं सुकं खोबरं किसून टाका, तरीही चालतं. ओला नारळ पण चालेल.नारळ थोडा परतला की त्यात आपलं पोहे आणि गुळाचं मिश्रण टाका. आता सगळं मंद गॅसवर चार पाच मिनिटं परता. सारखं हलवत राहा नाहीतर खाली लागेल. हळू हळू ते घट्ट होईल आणि कढई सोडायला लागेल.याच वेळी त्यात चिमूटभर मीठ टाका. गोडात थोडं मीठ टाकलं की चव अजून खुलते. मग वेलची पूड आणि थोडं जायफळ किसून टाका. गूळ आणि जायफळची जोडी एकदम भारी लागते. आवडत असतील तर काजू बदामाचे काप पण टाकू शकता.

मोदक कसे वळायचे?

मिश्रण थोडं गार झालं की हाताला थोडं तूप लावा. मोदकाच्या साच्याला पण आतून तूप लावा. मग थोडं थोडं मिश्रण साच्यात भरा आणि दाबा. साचा उघडला की मस्त आकाराचा मोदक बाहेर येईल. साचा नसेल तर हातानेच छोटे लाडू वळले तरी चालतात, बाप्पाला आकारापेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. हे मोदक फ्रिजमध्ये 2 दिवस आरामात टिकतात. ऐनवेळी पाहुणे आले किंवा नैवेद्यासाठी काही गोड हवं असेल तर ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. खवा, मावा काहीच न लागता, कमी वेळात आणि कमी खर्चात तयार होणारे हे गूळ-पोह्याचे मोदक एकदा नक्की करून बघा.

Web Title: Make delicious modaks from flattened rice and jaggery in 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • lifesytle news
  • lifesytyle
  • Marathi News

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!
1

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
2

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष
3

Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा
4

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.