Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळचा नाश्ता जरा हेल्दी होऊन जाऊद्यात; घरी बनवा पौष्टिक पण चवदार असा कुरकुरीत रागी डोसा

सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. याला पौष्टिक बनवून तुम्ही आरोग्याची आणखीन काळजी घेऊ शकता. डोसा सर्वांच्या आवडीचा नाश्ता आहे अशात याला हेल्दी ट्विस्ट देऊन तुम्ही घरी नाचणीचा डोसा तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2025 | 09:47 AM
सकाळचा नाश्ता जरा हेल्दी होऊन जाऊद्यात; घरी बनवा पौष्टिक पण चवदार असा कुरकुरीत रागी डोसा

सकाळचा नाश्ता जरा हेल्दी होऊन जाऊद्यात; घरी बनवा पौष्टिक पण चवदार असा कुरकुरीत रागी डोसा

Follow Us
Close
Follow Us:

सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी करायला हवा. यामुळे दिवसभर आपल्या शरीरात काम करण्यासाठी एनर्जी बनून राहते. तुम्हीही हेल्दी रेसिपीच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास चविष्ट अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुमच्या घरात सर्वांनाच खुश करेल आणि त्यांच्या आरोग्याची काळजीही घेईल. या रेसिपीचे नाव आहे रागी डोसा, म्हणजेच नाचणीच्या पिठापासून तयार केलेला कुरकुरीत डोसा.

नागपंचमीनिमित्त सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पारंपरिक तिळाच्या करंज्या, नोट करून घ्या पदार्थ

नाचणी एक पौष्टिक धान्य आहे जे फायबर, कॅल्शियम आणि लोहाने भरलेले असते. नाचणीपासून तयार केलेला चीला हा एक झटपट होणारा, हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आहे. हा हेल्दी डोसा खासकरून वजन कमी करणाऱ्यांसाठी, मधुमेह असलेल्या व्यक्तींना आणि लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. आजरांचा धोका पाहता आपण आपल्या आहारात जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थांचा समावेश करायला हवा. चला तर मग नाचणीचा डोसा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • रागी पीठ (नाचणी पीठ) – 1 कप
  • बेसन पीठ – 2 टेबलस्पून
  • दही – 2 टेबलस्पून
  • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो – 1 छोटा (बारीक चिरलेला)
  • हिरव्या मिरच्या – 1-2 (बारीक चिरलेल्या)
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • हळद – 1/4 टीस्पून
  • जिरं – 1/2 टीस्पून
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (चिरलेली)
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – शेकण्यासाठी
श्रावणातील उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकवून राहण्यासाठी झटपट बनवा बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक

कृती

  • एका मोठ्या भांड्यात रागी पीठ, बेसन पीठ, दही आणि थोडं पाणी एकत्र करून मिक्स करा. गाठी राहू देऊ नका. गुठळीरहित पातळसर भिजवून घ्या.
  • कांदा, टोमॅटो, मिरच्या, आले-लसूण पेस्ट, जिरं, हिंग, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा.
  • हे मिश्रण डोशाच्या पीठासारखं पातळसर असावं, फार पातळ नाही आणि फार घट्टही नाही. गरज असल्यास थोडं पाणी घाला.
  • नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर थोडं तेल पसरवा.
  • एक मोठा चमचा बॅटर घेऊन तव्यावर ओता आणि हलक्याने गोलाकार फिरवून पसरवा. वरून थोडं तेल सोडा.
  • एक बाजू भाजल्यावर उलटून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. दोन्ही बाजू कुरकुरीत आणि ब्राऊनसर रंगाची झाली पाहिजे.
  • तयार रागी चीला गरम गरम दही, चिंच-गुळाची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
  • तुम्ही यात बारीक किसलेली गाजर, कोबी, पालक किंवा मेथीही घालू शकता.
  • हा नाश्ता अगदी 15-20 मिनिटांत तयार होतो, त्यामुळे ऑफिस किंवा शाळेच्या घाईत हा एक उत्तम पर्याय ठरतो.
  • ह्या हेल्दी आणि झटपट रागी चिला तुमची सकाळ आणखीन बहारदार बनवेल!

Web Title: Make healthy and tasty ragi dosa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • Breakfast Dishes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
3

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’
4

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.