1 रुपयाही खर्च न करता घरीच बनवा तांदळाचा फेसवॉश, कोरियन मुलींसारखी त्वचा होईल चमकदार आणि तुकतुकीत
तांदूळ हा अनेकांच्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. रोजच्या आहारात तांदळाचे सेवन होत असते. काहींना तर भाताशिवाय जेवण जातच नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का? या तांदळाचा तुमचा चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो. तुमच्या त्वचेला नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक रित्या सुंदर बनवण्यासाठी, तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तांदळाचा फेसवॉश तयार करू शकता. तांदळाचे पाणी आणि तांदळाच्या पीठात असलेल्या पोषणतत्त्वांमुळे त्वचा चमकदार बनण्यास मदत मिळते.
सध्या कोरियन स्किनकेअर फार चर्चेत आहे. कोरियन लोकांकडे पाहून अनेकांना त्यांचा स्किनकेअरविषयी अप्रूप वाटू लागते. न तुम्हाला माहिती आहे का? आपला चेहरा सुंदर ठेवण्यासाठी कोरियन लोक आपल्या स्किनकेअर तांदळाचा मोठ्या प्रमाणात वार करतात. तांदळातील नैसर्गिक घटक चेहरा क्लीन करण्यास आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास फार फायदेशीर ठरत असते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी तुम्हाला बाजारातून महागडे प्रोडक्टस खरेदी करण्याची कोणतीही गरज नाही तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरीच राइस फेसवॉश तयार करू शकता आणि याचा वापर आपल्या चेहऱ्यावर करू शकता. याच्या नियमित वापराने निश्चितच तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला फरक दिसू लागेल.
हेदेखील वाचा – जपानचे लोक रोज या गोष्टी फॉलो करून जगतात 100 वर्ष आयुष्य, दीर्घकाळ राहतात फिट आणि स्लिम
तांदळाचा फेसवॉश तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तांदळाचे पीठ तयार करावे लागले. यासाठी प्रथम एक कप तांदूळ घ्या आणि ते चांगले धुवा. त्यानंतर तांदूळ एका तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा. तांदूळ थोडे वाळवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून तांदळाचे पीठ तयार करा. हे पीठ एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता.
तांदळाच्या पाण्यात नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीसाठी तुम्हाला या पाण्याचा फार फायदा होणार आहे. तांदूळ धुतल्यानंतर त्याचे पाणी बाजूला काढून ठेवा. हे पाणी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. याचा वापर तुम्ही फेस वॉश म्हणून करू शकता. त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर कारण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरतो.
हेदेखील वाचा – 20 रुपयांच्या किमतीत मिळणाऱ्या या भाज्या खेचून काढतात रक्तातील घाण, आजच आहारात करा समावेश
तांदळाचा फेसवॉश तयार करण्यासाठी सर्वप्रथम तांदळाच्या पीठात थोडे तांदळाचे पाणी घाला. मग यात हळद किंवा मध मिसळा. या मिश्रणाने चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील मृत झालेल्या पेशी निघून जातात आणि चेहरा अधिक ताजेतवाने दिसू लागतो.