बदलत्या काळानुसार, आपल्या आहारातही अनेक बदल झाले. इतर गोष्टींप्रमाणेच वेळोवेळी आणि योग्य रीतीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. अनेकांच्या आहारात भाज्यांचे प्रमाण फार कमी असते, परिणामी लोक कमी वयातच अनेक आजरांनी ग्रासलेले असतात. भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करत असतात. ज्यांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे त्यांनी तर आपल्या आहारात भाज्यांचे नियमित सेवन करायला हवे. यातील फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर घटक असतात, जे कोलेस्टेरॉलच्या पातळीला संतुलित ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
तसेच भाज्या आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) बाहेर काढण्यासही आपली मदत करत असतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही स्वस्त भाज्यांविषयी सांगणार आहोत ज्यांचे नियमित सेवन तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. अनेक पोषकतत्वांनी युक्त या भाज्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास आणि रक्तातील घाण बाहेर काढण्यास मदत करतात.
हेदेखील वाचा – केळी आणली की लगेच काळी पडतात? मग ही ट्रिक वापरून पहा, आठवडाभर राहतील फ्रेश
गाजर ही हेल्दी भाजी आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेक हेल्दी पदार्थांमध्ये गाजराचा वापर केला जातो. गाजरात पेक्टिन नावाचा फायबर असतो, जो शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यात मदत करतो. याचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टोल तर नियंत्रित राहतेच शिवाय हृदयदेखील निरोगी राहण्यास मदत मिळते. तुम्ही याचे कच्चेदेखील सेवन करू शकता. तुम्ही तुमच्या सलाडमध्ये याचा समावेश करू शकता. गाजरामध्ये व्हिटॅमिन A देखील मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
काकडीचा अनेक प्रकारे फायदा होत असतो. फक्त शरीराच्या निरोगी आरोग्यासाठीच नव्हे तर चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीसाठीही काकडी फार मदतनीस ठरते. काकडी फायबर आणि पाण्याने भरपूर असते, जी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. तुम्ही काकडी कच्ची सलाडमध्ये टाकून खाऊ शकता. काकडीमध्ये कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित करण्यास याची मदत होते. काकडीच्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.
हेदेखील वाचा – भाजीत तेल जास्त झालं? मग चिंता सोडा आणि या घरगुती टिप्सचा वापर करा
अनेक भाज्यांमध्ये वापरला जाणारा टोमॅटोदेखील तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा अँटीऑक्सिडंट असतो, जो खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी करण्यात मदत करतो. टोमॅटो भाजीत टाकून किंवा कच्चा अशा दोन्ही प्रकारे खाता येतो. तुम्ही टोमॅटोची चटणी, सूप असे अनेक चविष्ट पदार्थ बनवून याचा आपल्या आहारात समावेश करू शकता.