Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खुसखुशीत दुधीभोपळ्याचा चिला; रेसिपी नोट करा

Pumpkin Chila Recipe : दुधीभोपळ्याची भाजी खायला आवडत नसेल तर यावेळी याचा खमंग असा चिला बनवून पहा. हा चिला फार झटपट तयार होतो आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 13, 2025 | 10:07 AM
सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खुसखुशीत दुधीभोपळ्याचा चिला; रेसिपी नोट करा

सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खुसखुशीत दुधीभोपळ्याचा चिला; रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • दुधीभोपळ्यामध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात
  • याची भाजी खायला आवडत नसेल तर यापासून खमंग चिला तयार केला जाऊ शकतो
  • हा चिला फार झटपट तयार होतो
दुधीभोपळा हा एक हलका, पचायला सोपी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर भाजी आहे. अनेकदा दुधीभोपळ्याची भाजी, कोफ्ते किंवा सूप इतक्यापुरताच त्याचा वापर मर्यादित राहतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की दुधीभोपळ्यापासून अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा चिला देखील तयार करता येतो? खासकरून सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या रात्रीच्या जेवणासाठी दुधीभोपळ्याचा चिला हा एक उत्तम पर्याय आहे.

Recipe : हिमाचलची फेमस डिश ‘सिद्दू’ खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

दुधीभोपळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहते, वजन कमी करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो आणि पचनक्रिया सुधारतो. यात असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला आवश्यक पोषण देतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा चिला योग्य आहे. शिवाय, कमी तेलात तयार होणारी ही रेसिपी डायट करणाऱ्यांसाठीही परफेक्ट आहे. चला तर मग पाहूया, सोप्या पद्धतीने दुधीभोपळ्याचा चिला कसा बनवायचा. नोट करून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

 साहित्य:

  • किसलेला दुधीभोपळा – 1 कप
  • बेसन – 1 कप
  • हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
  • आले – 1 टीस्पून (किसलेले)
  • हळद – ¼ टीस्पून
  • जिरे – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – चिला भाजण्यासाठी
Bun Dosa : साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल तर हा ‘बन डोसा’ तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवा

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात किसलेला दुधीभोपळा घ्या.
  • त्यात बेसन, हिरवी मिरची, आले, हळद, जिरे आणि मीठ घाला.
  • सर्व साहित्य नीट एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्ट पीठ तयार करा.
  • शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण पुन्हा एकदा मिसळा.
  • तवा गरम करून थोडे तेल पसरवा.
  • तव्यावर एक पळी पीठ घेऊन गोलाकार चिला पसरवा.
  • मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. असेच सर्व चिले तयार करून घ्या.
  • गरमागरम दुधीभोपळ्याचा चिला हिरवी चटणी, दही किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. हा चिला पौष्टिक, चविष्ट आणि झटपट तयार होणारा असल्याने नक्कीच तुमच्या कुटुंबाचा फेव्हरेट बनेल.

Web Title: Make tasty and quick pumpkin recipe at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.