केसांच्या वाढीसाठी बनवा हे पदार्थ वापरा
सर्वच महिलांना लांब आणि सुंदर केस आवडतात. मात्र हल्ली बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम केसांच्या निरोगी वाढीवर सुद्धा दिसून आला आहे. केस लांबलचक होतात, मात्र पुन्हा एकदा केस गळून पुन्हा एकदा पातळ होऊन जातात. केसांच्या वाढीवर धूळ, माती, प्रदूषण, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो . त्यामुळे निरोगी आरोग्यासारखी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण अनेक महिला केसांच्या वाढीसाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट आणून लावतात.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
बाजारात मिळणाऱ्या केमिकल प्रॉडक्टमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल पदार्थांचा वापर केला जातो. पण सतत केमिकल प्रॉडक्ट किंवा ट्रीटमेंट करून घेऊ नये . तर काही मुली केस चिकट होतात म्हणून केसांना तेल लावत नाही. तेल न लावल्यामुळे केस निस्तेज आणि केसांमधील चमक निघून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा कसा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये जास्वंदीच्या फुलांचा वापर केला. जास्वंदी त=केसांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. जास्वंदीच्या फुलांचा वापर करून तुम्ही घरी हेअर मास्क सुद्धा बनवू शकता. यासाठी अर्धा वाटी खोबरेल तेलात ४ जास्वंदीची पाने टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर तयार केलेले तेल बाटलीमध्ये उठून थंड करण्यासाठी ठेवा. हे रात्र रात्री झोपताना लावून नंतर शॅम्पूच्या सहाय्याने स्वच्छ करून घ्या.
कढीपत्ता आणि कांदा केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करते. कांदा अनेक लोक जेवणात कच्चा खरातात . तसेच हल्ली कांद्याचे तेल सगळीकडे प्रसिद्ध झाले आहे. कांदा कापून त्यात कढीपत्त्याची पान टाकून खोबरेल तेलात गरम करून घ्या. यामुळे केसांची वाढ चांगली होईल. कढीपत्ता आणि कांद्याच्या रसाला उग्र वास येतो. मात्र तरीसुद्धा या तेलाचा वापर केला जातो.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
स्वयंपाक घरातील काम करताना मेथी दाणे आणि खोबरेल तेलाचा वास येतो. याशिवाय रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा मेथी दाणे फायदेशीर ठरतात. वाटीभर तेलात अर्धा चमचा मेथी दाणे टाकून गरम करून घ्या. त्यानंतर तेल थंड करून केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे व्यवथित लावून ठेवा .