या दिवाळीला थोडासा हटके फरळ आणि त्या मध्ये हा पदार्थ बनवा केळीची शेव ते ही झटपट केळीची शेव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 1/4 कप तांदळाचे पीठ एक कप बेसन 1 कच्ची केळी (उकडून किंवा किसलेले) 1 चमचा आले-लसूण पेस्ट 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट अर्धा चमचा लिंबाचा रस 1 चमचा तेल 1 चमचा बेकिंग पावडर मीठ चवीनुसार तळण्यासाठी तेल. कृती केळीची शेव तयार करणसाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि बेकिंग पावडर, एक चमचा तेल, अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 कच्ची केळी (उकडून किंवा किसलेले) 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाका. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्या. पीठ घट्ट मळायचे आहे. आता शेव मोल्डमध्ये टाकू पीठाचा गोळा टाकून गरम तेलामध्ये शेव टाका. कुरकुरीत होईपर्यंत शेव तळून घ्या. चहा किंवा कॉफीसोबत तुम्ही ही शेव खाऊ शकता