Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळ करा हेल्दी, सकाळच्या नाश्त्याला कडधान्यांपासून बनवा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेला चविष्ट चिला

Sprouts Chila Recipe : कडधान्यांचा हा चिला हा फक्त चविष्टच नाही तर ऊर्जा देणारा, प्रथिनांनी समृद्ध आणि दिवसाची उत्तम सुरुवात करणारा हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच हा नाश्ता घरी तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2025 | 12:54 PM
सकाळ करा हेल्दी, सकाळच्या नाश्त्याला कडधान्यांपासून बनवा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेला चविष्ट चिला

सकाळ करा हेल्दी, सकाळच्या नाश्त्याला कडधान्यांपासून बनवा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेला चविष्ट चिला

Follow Us
Follow Us:

आजकाल आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. फास्टफूड आणि जंकफूडमुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी लोक हेल्दी आहाराला प्राधान्य देतात. त्यातही स्प्राऊट्स (म्हणजेच अंकुरलेले कडधान्ये) हा आहारातील अत्यंत पोषक आणि आरोग्यदायी भाग मानला जातो. स्प्राऊट्समध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पचन सुधारते, ऊर्जा मिळते आणि शरीर तंदुरुस्त राहते.

वयाच्या ७० व्या वर्षी हाड राहतील कायमच मजबूत आणि लवचिक! नियमित करा अळीवाच्या लाडूंचे सेवन, नोट करा रेसिपी

पण रोज रोज कच्चे स्प्राऊट्स खाल्ले की कंटाळा येतो. म्हणूनच त्यापासून काहीतरी नवीन आणि चविष्ट पदार्थ करणे उत्तम ठरते. आज आपण स्प्राऊट्स चिल्ला ही झटपट, पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी पाहणार आहोत. हा पदार्थ न्याहारीसाठी, डब्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम आहे. तेल कमी लागतो, प्रथिनांचा भरपूर स्रोत आहे आणि अगदी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आहे. मुख्य म्हणजे हा चिला बनवण्यासाठी फार वेळही गरज नाही तर झटपट तुम्ही हा तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • १ कप मिश्रित स्प्राऊट्स (मटकी, मूग, हरभरा इ.)
  • २ टेबलस्पून बेसन
  • १ टेबलस्पून रवा (पर्यायी)
  • १ कांदा (बारीक चिरलेला)
  • १ टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • १-२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • चवीनुसार मीठ
  • ½ टीस्पून हळद
  • ½ टीस्पून लाल तिखट
  • पाणी (गरजेनुसार)
  • शिजवण्यासाठी थोडेसे तेल
Ganesh Chaturthi 2025 : जाण्याआधी बाप्पाला खुश करा, नैवेद्यात खाऊ घाला काजूचे मोदक; फार सोपी आहे रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम स्प्राऊट्स मिक्सरमध्ये घालून थोडंसं जाडसर वाटून घ्या.
  • त्यात बेसन, रवा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद व तिखट टाका.
  • थोडं पाणी घालून जाडसर पीठ तयार करा (डोश्याच्या पिठासारखं).
  • तवा गरम करून त्यावर थोडं तेल लावा.
  • एका डावाने पीठ तव्यावर घालून हलकं पसरवा.
  • वरून थोडंसं तेल सोडा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी भाजून घ्या.
  • गरमागरम स्प्राऊट्स चिल्ला चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
  • चव वाढवण्यासाठी पीठात पालकाची प्युरी, गाजराचा कीस किंवा बीट किसून घालू शकता.
  • तिखट खाणाऱ्यांसाठी लाल तिखट किंवा चाट मसाला वाढवू शकता.
  • हा पदार्थ तव्याऐवजी नॉनस्टिक पॅनवर केल्यास अजिबात तेल लागत नाही.

FAQs (संबंधित प्रश्न)

चिलाचे पीठ आपण किती काळ फ्रीजमध्ये ठेवू शकतो?
२ दिवसांपर्यंत हे पीठ फ्रिजमध्ये ठेवता येते. चिला बनवण्यापूर्वी फ्रिजमधून हे पीठ बाहेर काढून ठेवा.

अकुंरलेले कडधान्य कोणी खाऊ नये?
लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचे कच्चे अंकुर खाणे टाळावे.

Web Title: Make your morning healthy know how to make protein fiber and vitamin rich sprout chila recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
1

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर
3

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा
4

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.