वयाच्या ७० व्या वर्षी हाड राहतील कायमच मजबूत आणि लवचिक! नियमित करा अळीवाच्या लाडूंचे सेवन
वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांमध्ये कंबर दुखणे, गुडघे दुखणे, अंग दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यानंतर हाडे दुखतात. अशावेळी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी अळीवाच्या बियांचे सेवन करावे. अळीवाच्या बियांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अळीवाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.अळीवाच्या बियांमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय महिलांच्या आरोग्यासाठी अळीव वरदान ठरतात. त्यामुळे दैनंदिन आहारात अळीवाच्या बियांचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात किंवा इतर वेळी अळीवाच्या लाडूचे सेवन केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया अळीव लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)
ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी, जिभेवर ठेवताच विरघळेल पदार्थ
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ