साहित्य ब्रेड स्लाइस - 3-4 दूध - 2 कप दूध पावडर - 2 टीस्पून तूप - 2 टीस्पून सुका मेवा - 1 कप गुलाबाची पाने - 1 कप कृती प्रथम ब्रेडचे तुकडे कडातून कापून घ्या. यानंतर ब्रेडचा पांढरा भाग चौकोनी आकारात कापून घ्या. कढईत तूप गरम करून त्यात ब्रेड टाका, ब्रेड दोन्ही बाजूंनी बदामी होईपर्यंत चांगली भाजून घ्या. ब्रेड तपकिरी होऊन कुरकुरीत झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. दुसर्या पातेल्यात तूप टाकून गरम करा. आता तुपात दूध घाला. दुधाला उकळी आल्यावर त्यात मिल्क पावडर घाला. दूध घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. दूध रबरीसारखे दिसले की गॅस बंद करा. तयार दूध ब्रेडच्या स्लाइसवर चांगले पसरवा. यानंतर ड्रायफ्रुट्स कापून ब्रेड सजवा. ड्रायफ्रुट्सनंतर ब्रेडवर गुलाबाची पाने सजवा. तुमचा राबडी मलाई टोस्ट तयार आहे. फ्रीजमध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.