आता पालकच ठरवणार आपलं बाळ कसं दिसणार (फोटो सौजन्य - iStock
आजच्या युगात, विज्ञानाने मानवी जीवन जितके सोपे केले आहे तितकेच ते आश्चर्यकारकही बनवले आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा पालक केवळ त्यांच्या मुलाचा जन्मच ठरवू शकणार नाहीत तर त्यांच्या इच्छेनुसार मुलाच्या डोळ्यांचा रंग, केसांचा पोत आणि त्वचेचा रंगदेखील ठरवू शकतील. न्यूक्लियस जीनोमिक्स या अमेरिकन जीनोमिक्स कंपनीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे, जे मुलांच्या जीन्सना अनुकूलित करू शकते. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण आता या नव्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यात आल्याचा दावा या कंपनीने केलाय, जाणून घेऊया अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
काय आहे सॉफ्टवेअर
आतापर्यंत, IVF मध्ये, प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणूंचे फर्टिलायझेशन करून महिलेच्या गर्भाशयात गर्भ प्रत्यारोपित केला जात असे. परंतु न्यूक्लियस जीनोमिक्सने एक पाऊल पुढे जाऊन ‘न्यूक्लियस एम्ब्रियो’ नावाचे अनुवांशिक ऑप्टिमायझेशन सॉफ्टवेअर विकसित केले आहे, जे गर्भाच्या डीएनएचे विश्लेषण करून 900 हून अधिक रोगांची शक्यता तपासू शकते. यामध्ये मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यासारखे गंभीर आजार समाविष्ट आहेत.
IVF प्रक्रियेला घाबरुन जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला
IQ आणि मानसिक आरोग्यही कळणार
केवळ आजारच नाही तर हे तंत्रज्ञान बुद्ध्यांक अर्थात IQ, नैराश्य, चिंता, बीएमआय आणि गर्भातील उंची यासारख्या मानसिक स्थितींशी संबंधित मार्करची माहितीदेखील देत असल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर पालक आता केसांचा रंग, डोळ्यांचा रंग आणि त्वचेचा रंग यासारख्या वैशिष्ट्यांच्या आधारे गर्भाची निवड करू शकतील. यामुळे आपलं बाळ नक्की कसं दिसू शकतं हे त्याचे पालक ठरवू शकतील.
सॉफ्टवेअर कसे काम करते
जर तुम्ही आयव्हीएफद्वारे बाळाची योजना आखत असाल, तर तुम्ही तुमच्या क्लिनिकमधून २० गर्भांचा डीएनए डेटा अपलोड करू शकता. हे सॉफ्टवेअर त्यांचे विश्लेषण करेल आणि नंतर एक तपशीलवार अहवाल देईल, जेणेकरून पालक त्यांच्यासाठी कोणता गर्भ ‘सर्वोत्तम’ आहे हे ठरवू शकतील.
जरी या तंत्रज्ञानाला वैद्यकीय शास्त्रात मोठी झेप मानली जात असली तरी, नैतिक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. मानव आता मुलांची रचना करेल का? कंपनीचे २५ वर्षीय संस्थापक कियान सादेघी म्हणतात की ज्याप्रमाणे लोक त्यांचे आरोग्य जाणून घेण्यासाठी डीएनए चाचण्या करतात, त्याचप्रमाणे गर्भाची निवडदेखील दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी आहे. मात्र हे तंत्रज्ञान कधीपासून वापरात येणार अथवा त्याचा कसा उपयोग केला जाऊ शकतो आणि त्याचा कोणता दुष्परिणाम असू शकतो याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. आता माणूसच आपलं मूल आपल्याप्रमाणे घडवणार असल्याचा चमत्कार पहायला मिळणार आहे हे मात्र नक्की!
World IVF Day: आयव्हीएफ उपचारांबद्दलच्या गैरसमजुती, पद्धतीबाबत घ्या जाणून
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.