अंबानींच्या घरात नाश्त्याला बनतो हा 40 रुपयांचा पदार्थ, फायदे वाचून तुम्हीही कराल आहारात समावेश
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींच्या कुटुंबाचा आवर्जून समावेश येतो. अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या संपत्तीचा देखावा हा होतोच. अंबानींची वार्षिक सरासरी 8000 कोटींहून अधिक आहे. जगातील 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव येते. अशात अनेकदा इतका श्रीमंत व्यक्ती नक्की काय खात असावा असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. उद्योगपती मुकेश अंबानी हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये गणले जात असले तरी त्यांची जीवनशैली आणि जेवण अगदी साधे आहे.
मुकेश आणि त्यांची पत्नी नीता अंबानी खाण्यापिण्याचे फार शौकीन आहेत. मोठमोठ्या 5 स्टार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या प्रसिद्ध पदार्थ आणि पाककृतींऐवजी, नीता आणि मुकेश अंबानी यांना अगदी साधे स्ट्रीट फूड आणि घरी बनवलेले अन्न खायला आवडते. अशातच नाश्ताबद्दल बोलणे केले तर, मुकेश अंबानी यांना इडली सांबार खायला फार आवडते. यातही त्यांना ‘कॅफे मैसूर’ या जागी मिळणार इडली सांबार अधिक आवडतो. इडली सांबार अनेक भारतीयांचा एक आवडता आणि सोलफूल नाश्ता आहे. फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही हा नाश्ता फायद्याचा ठरत असतो. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – वेळीच सावध व्हा! एकमेकांचे उष्टे खाल्ल्याने प्रेम नाही आजार वाढतात
इडली आणि सांबार हे दोन्ही कमी कॅलरी असलेले पदार्थ आहेत. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण फार कमी असते. याशिवाय, हे देखील उच्च फायबरयुक्त पदार्थ आहेत. फायबर आपल्या पचनासाठी फार चांगले मानले जाते. जर तुम्ही रोज इडली किंवा सांबार खाल्ल्यास पोट अधिक काळ भरलेले राहते आणि याने सारखी भूकही लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही कमी कॅलरीज खाता आणि यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही नक्कीच या पदार्थाचा समावेश करू शकता.
इडली आणि सांबारमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. आपल्या आहारात फायबरचे असणे फार गरजेचे असते. फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. जेव्हा आपण दररोज इडली आणि सांबार दीर्घकाळ खातो तेव्हा त्यातील फायबर आपल्याला बद्धकोष्ठता, पेटके, पोटदुखी इत्यादी पाचन समस्यांपासून आराम देईल.