एकाच ताटात जेवण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
एकाच ताटात जेवल्याने प्रेम वाढत, असे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण एका ताटात जेवल्यामुळे आजारांचा धोका सुद्धा वाढू शकतो. शास्त्रानुसार, एकाच ताटामध्ये जेवल्यामुळे आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी जेवताना वेगवेगळ्या ताटात जेवावे. एकाच ताटात जेवल्यामुळे इतर आजार झालेल्या व्यक्तींचे आजार तुम्हाला होऊ शकतात. तसेच आयुर्वेदामध्ये एकाच ताटामध्ये न जेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एकाच ताटात जेवल्यामुळे आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात? एकाच ताटात जेवल्यामुळे कोणते आजार होण्याची शक्यता असते? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
एकाच ताटात जेवल्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीच एकाच ताटात जेवू नये. तसेच दूषित किंवा शिळे झालेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे संसर्ग वाढू लागतो. त्यामुळे रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात नेहमी ताजे अन्नपदार्थ खावेत. दूषित अन्नामध्ये असलेले जिवाणू किंवा विषाणू ,बॅक्टेरिया वाढून शरीरामध्ये प्रवेश करतात.
हे देखील वाचा: धूळ, मातीमुळे पाय काळवंडले आहेत? मग टॅनिंग काढण्यासाठी ‘या’ पदार्थाचा करा वापर, पाय दिसतील गोरे
एखादया व्यक्तीच्या ताटामधील दूषित अन्नपदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला श्वसनाची समस्या जाणवू शकते. ही समस्या वाढल्यानंतर दात आणि हिरड्या हळूहळू खराब होऊ लागतात. त्यामुळे खराब झालेली अन्नपदार्थ चुकूनही खाऊ नका.
एकाच ताटात जेवल्यामुळे तोंड येण्याची शक्यता असते. तोंड आल्यानंतर जीभ आणि हिरड्यांची त्वचा लाल होऊन जाते. तसेच इतरांसोबत अन्नपदार्थ शेअर केल्यामुळे एकमेकांची लाळ तोंडामध्ये प्रवेश करून संसर्गाचा धोका वाढतो. यामुळे सर्दी, खोकला आणि फ्लू किंवा आरोग्याची स्थिती बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीच एकाच ताटात जेवू नये.
हे देखील वाचा: तिळामध्ये असलेले गुणधर्म तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या फायदे
एकमेकांच्या ताटात जेवल्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांच्या ताटात जेवू नये. तसेच शिळे अन्नपदार्थ पोटात गेल्यामुळे पोटासंबंधित आजार होण्याची शक्यता असते.