फोटो सौजन्य - Social Media
जगामध्ये संगीताला फार महत्व आहे. येथे चराचरामध्ये संगीत आहे. आपल्या बोलण्यापासून ते आपल्या प्रत्येक हालचालींमध्ये संगीत आहे. फक्त आपल्याच नव्हे तर निसर्गाच्या प्रत्येक घटकामध्ये संगीत दडलं आहे. निसर्ग आणि संगीत यांचा खूप जवळचा संबंध आहे. शांत सकाळी भासणारी शांतता देखील संगीताचेच रूप आहे. त्यात कोकिळेचा स्वर आणि इतर पक्षांच्या किलबिलाट, यापेक्षा सुंदर धून कोणती? निसर्ग सर्वात मोठा आणि प्राचीन संगीतकार आहे. तसे मानवनिर्मित संगीतही निसर्गासाठी फार महत्वाचे आहे.
हे देखील वाचा : वेलचीचे पाणी काही मिनिटांतच दूर करेल पोटाची उष्णता, जाणून घ्या फायदे
खासकरून, बाग फुलवणाऱ्या माळ्याला संगीतकार असणे गरजेचे आहे. संगीतकार नाही तर केवळ संगीतासाठी वेड बाळगणे गरजेचे आहे. संगीतासाठी बाळगलेले वेड त्याच्या सुखदुःखाचा आधार तर बनेलच, त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे त्याची बाग फुलण्यास मोठी मदत होईल. ‘जर्नल बायोलॉजी लेटर्स’ मध्ये पब्लिश केलेल्या एका संशोधनानुसार, संगीताच्या सानिध्यात असलेले निसर्ग संगीताच्या सानिध्यात नसलेल्या निसर्गापेक्षा लवकर फुलतं. संगीताच्या सानिध्यात वाढणे झाडांसाठी, फळ फुलांसाठी फार फायदेशीर ठरते.
संगीताचा परिणाम केवळ मनावरच नाही, तर निसर्गावरही होतो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. बागेत संगीत वाजवल्यास झाडे फुलून येतात आणि त्यांची वाढही चांगली होते. काही संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की, संगीताची लय आणि ध्वनी लहरींमुळे झाडांच्या पेशींच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. यामुळे झाडांमध्ये पोषक तत्त्वांचे शोषण वाढते आणि त्यांची वाढ अधिक वेगवान होते. शास्त्रीय संगीत निसर्गाला सकारात्मक प्रतिसाद देतात. संगीतातून निघणारा प्रत्येक कंपन वृक्षांना पोषण देते.
हे देखील वाचा : मुंबई प्रेस क्लबसह वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलतर्फे जागतिक हृदय दिन साजरा
संगीतामधून निघणाऱ्या लहरी झाडांमध्ये खनिजांचे शोषण वाढवतात. परिणामी, फुलं आणि फळं अधिक प्रमाणात लागतात. संशोधनात असेही दिसून आले की, झाडे संगीताच्या कंपनांना प्रतिसाद देतात, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती देखील सुधारते. संगीताच्या या सकारात्मक परिणामांचा उपयोग शेती आणि बागकामामध्ये वाढत्या प्रमाणात होत आहे. बागकामात संगीत वापरून पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक पद्धतीने उत्पादन वाढवणे शक्य होत आहे.