Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपल्या प्रामाणिकतेसाठी ओळखलं जात भारतातील हे गाव, इथे घरांना ना कुलूप, ना चोरी होण्याची भीती

नागालँडमधील एक गाव आपल्या प्रामाणिकतेसाठी प्रसिद्ध आहे. इथे दुकाने कुलूपविरहित, घरांना ताळे नाहीत आणि लोक विश्वासावर जगतात. हे आशियातील पहिलं ग्रीन व्हिलेज आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 07, 2025 | 08:26 AM
आपल्या प्रामाणिकतेसाठी ओळखलं जात भारतातील हे गाव, इथे घरांना ना कुलूप, ना छोटी होण्याची भीती

आपल्या प्रामाणिकतेसाठी ओळखलं जात भारतातील हे गाव, इथे घरांना ना कुलूप, ना छोटी होण्याची भीती

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा ऐकतो की लोकांमध्ये विश्वास कमी होत चालला आहे. पण कल्पना करा, अशीही एखादी जागा आहे जिथे लोक इतके विश्वासू आहेत की दुकाने कुलूप न लावणेही स्वाभाविक मानले जाते. होय, ही गोष्ट गोष्टीसारखी वाटली तरी ती खरी आहे. भारतातील नागालँड राज्यातलं खोनोमा हे गाव त्याचं जिवंत उदाहरण आहे. हे गाव केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठीच नव्हे तर आपल्या अपूर्व प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहे.

भारताच्या या मंदिरात स्वयं प्रकट झाले होते भगवान गणेश; काय आहे उलट्या स्वस्तिकाची परंपरा, जाणून घ्या

विश्वासावर चालणाऱ्या दुकाने

खोनोमा गावात फेरफटका मारताना तुम्हाला भाज्यांच्या, फळांच्या किंवा छोट्या पुस्तकांच्या दुकाने दिसतील. पण आश्चर्य म्हणजे इथे दुकानदार कोणीच नसतो. ग्राहक आपल्या गरजेचा माल स्वतः निवडतो आणि पैसे शेजारी ठेवलेल्या डबीत टाकतो. ही प्रामाणिकतेवर चालणारी पद्धत इथे अनेक वर्षांपासून सुरू असून आजही तितक्याच शिस्तीने पाळली जाते.

घरांना कुलूपांची गरज नाही

या गावातील लोक इतके साधे, प्रामाणिक आणि विश्वासू आहेत की आपल्या घराला ते कुलूप लावत नाहीत. त्यांना ठाम विश्वास असतो की त्यांच्या वस्तूंना कोणीही हात लावणार नाही. चोरी ही इथे पाप मानली जाते आणि त्यामुळे अशी गरजच निर्माण होत नाही.

‘केन्यो’ परंपरेची शिकवण

खोनोमा गावाच्या अंगामी जमातीमध्ये ‘केन्यो’ नावाची परंपरा प्रचलित आहे. या परंपरेत १५० हून अधिक नियम व बंधने आहेत, ज्यातून लोकांना निसर्गावर प्रेम करणे, एकमेकांचा आदर करणे आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणे शिकवले जाते. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीमध्ये शिस्त आणि नैतिकता खोलवर रुजली आहे.

आशियातील पहिलं ग्रीन व्हिलेज

खोनोमा गावाला आशियातील पहिलं ग्रीन व्हिलेज म्हणूनही मान्यता मिळाली आहे. इथे जंगलतोड आणि शिकार पूर्णपणे बंदीस्त आहे. गावकरी मानतात की माणूस आणि निसर्ग यांचं नातं विश्वासावरच उभं असावं, अगदी माणूस–माणसांप्रमाणे.

कलेचं आणि शिल्पाचं खजिना

हे गाव बांबू व ऊसाच्या कलेसाठी देखील प्रसिद्ध आहे. इथले कारागीर पिढ्यान् पिढ्या कौशल्याने आकर्षक व टिकाऊ वस्तू तयार करत आले आहेत. ही कला गावाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.

खोनोमाचं धडे देणारं जीवन

खोनोमा गाव हे केवळ एक पर्यटनस्थळ नाही तर आयुष्याला शिकवण देणारं ठिकाण आहे. इथे राहणारे लोक दाखवून देतात की विश्वास, प्रामाणिकता आणि माणुसकी हीच खरी संपत्ती आहे. आजच्या काळातही अशी एक दुनिया अस्तित्वात आहे, हे खोनोमा गाव आपल्याला प्रत्यक्ष दाखवून देतं. नागालँडमधील एक गाव आपल्या प्रामाणिकतेसाठी प्रसिद्ध आहे. इथे दुकाने कुलूपविरहित, घरांना ताळे नाहीत आणि लोक विश्वासावर जगतात. हे आशियातील पहिलं ग्रीन व्हिलेज आहे.

भारतातील 7 रहस्यमयी प्राचीन मंदिर ज्यांचे व धनी कोणी केले ते आजवर कुणाला कळू शकेल नाही; आजही आकर्षित करते यांचे रूप…

FAQs (संबंधित प्रश्न)

खोनोमा गावात ट्रेनने कसे पोहोचायचे?
याच्या जवळचे रेल्वे स्टेशन दिमापूर येथे आहे. ते प्रमुख भारतीय शहरांशी चांगले जोडलेले आहे. दिमापूर रेल्वे स्टेशनवरून, खोनोमाला पोहोचण्यासाठी कॅब भाड्याने घेता येते किंवा राज्य बस सेवेचा पर्याय निवडता येतो.

खोनोमा येथून सर्वात जवळचे विमानतळ कोणते आहे?
जर तुम्ही खोनोमाला विमानाने जायचे असेल तर दिमापूर हे सर्वात जवळचे विमानतळ आहे.

Web Title: Nagaland khonoma village in india is known for their honesty travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • Best Tourism Village
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

नर्तकीच्या प्रेमात राजाने बनवला भव्य आणि सुंदर किल्ला, पण एक कटाने सर्वच नष्ट केलं; काय आहे कथा?
1

नर्तकीच्या प्रेमात राजाने बनवला भव्य आणि सुंदर किल्ला, पण एक कटाने सर्वच नष्ट केलं; काय आहे कथा?

टाईम ट्रॅव्हल सारखा अनुभव देतात भारतातील ही ठिकाणे, कुटुंबासह एकदा नक्की भेट देऊन पाहा
2

टाईम ट्रॅव्हल सारखा अनुभव देतात भारतातील ही ठिकाणे, कुटुंबासह एकदा नक्की भेट देऊन पाहा

फक्त 20,000 रुपयांत करू शकता राजस्थानची सफर, खाण्यापासून राहण्यापर्यंत अशाप्रकारे करा प्रवासाचे नियोजन
3

फक्त 20,000 रुपयांत करू शकता राजस्थानची सफर, खाण्यापासून राहण्यापर्यंत अशाप्रकारे करा प्रवासाचे नियोजन

कांतारा चित्रपटाचा सीन सत्यात पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, इथेच झालिये शुटिंग
4

कांतारा चित्रपटाचा सीन सत्यात पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, इथेच झालिये शुटिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.