Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

Travel News : नवरात्रीच्या उत्सवाला लवकरच सुरुवात होणार असून या सणानिमित्त देवीच्या नऊ रुपांची मनोभावनेने पूजा केली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात कोणकोणत्या ठिकाणी देवीच्या नऊ रुपांची मंदिरे वसली आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2026 | 08:08 AM
Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते.
  • देशभरात देवीच्या विविध रूपांना समर्पित असलेली अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत.
  • नवरात्रीत या मंदिरांना भेट देण्याचे धार्मिक महत्त्व असून, प्रत्येक मंदिराची वेगळी मान्यता आहे.
शारदीय नवरात्री २०२६ ची सुरुवात यंदा ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस ११ ते १९ सप्टेंबर असणार आहेत तर २० सप्टेंबर रोजी दसरा हा सण साजरा केला जाणार आहे. नवरात्रीतील नऊ दिवस फार खास मानले जातात. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची मनोभावनेने पूजा केली जाते आणि रात्री गरबा हे सांघिक नृत्य खेळून रात्र जागवली जाते. देशभरात याकाळात ठिकठिकाणी देवीचे पंडाल उभारले जातात. तथापि, देवीच्या नऊ रुपांचे नऊ मंदिर याकाळात विशेष महत्त्वपूर्ण मानले जातात. नवरात्रीच्या उत्सवानिमित्त भाविक या मंदिरांना आवर्जून भेट देतात. चला तर देवीची नऊ रुपे आणि प्रत्येक रुपाचे मंदिर कुठे वसले आहे ते जाणून घेऊया.

देवी शैलपुत्री, काशी

हिमालयाची पुत्री म्हणून शैलपुत्री देवीला ओळखले जाते. एका मान्यतेनुसार, आपल्या जन्मानंतर देवी शैलपुत्री काशी या ठिकाणी आली होती आणि तिथेच ती विराजमान झाली. नवदुर्गेच्या प्रथम रुपातील शैलपुत्रीचे मंदिर तुम्हाला काशी घाटावर पाहायला मिळेल.

देवी ब्रह्मचारिणी, वाराणसी

उत्तर प्रदेशातच वाराणसी या ठिकाणी तुम्हाला देवीच्या दुसऱ्या रुपाचे म्हणजेच ब्रह्मचारिणीचे मंदिर पाहायला मिळेल. सांगितलं जात की, कठोर तपश्चर्येनंतर देवी ब्रह्मचारिणीने शिवाला आपले पती म्हणून प्राप्त केले होते. वाराणसीच्या बालाजी घाटावर तुम्हाला ब्रह्मचारिणीचे मंदिर दिसेल.

Significance of Navratri Nights: ‘नवरात्री’ असं नाव का पडलं? देवीच्या या …

देवी चंद्रघंटा, प्रयागराज

देवीचे तिसरे रुप म्हणजे चंद्रघंटा, याचे मंदिर देखील तुम्हाला उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी पाहायला मिळेल. या देवीची खासियत म्हणजे तिच्या डोक्यावर घंटा आकाराचा चंद्रकोर आहे. प्रयागराजमध्ये देवीचे मंदिर वसले असून त्याला हे क्षेमा माई मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

देवी कूष्मांडा मंदिर, कानपुर

नवदुर्गेच्या चाैथ्या रुपाचे नाव आहे कूष्मांडा. कानपुरच्या घाटमपूर ब्लॉकमध्ये या देवीचे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. मानले जाते की, देवीच्या या रुपाने आपल्या आतमध्ये संपूर्ण ब्रम्हांड सामावून घेतले आहे आणि म्हणूनच तिला कुष्मांडा हे नाव पडले.

देवी स्कंदमाता मंदिर, वाराणसी

देवीच्या पाचव्या रुपाचे नाव आहे स्कंदमाता. याचे प्राचीन मंदिर तुम्हाला वाराणसी येथे पाहायला मिळेल. देव स्कंद याची आई असल्याकारणाने या रुपाचे नाव स्कंदमाता असे पडले. वाराणसीतील मंदिराव्यतिरिक्त हिमाचल प्रदेशातील खाखनाल स्कंदमातेचे एक गुफा मंदिर देखील आहे.

देवी कात्यायनी मंदिर, अवेर्सा

दुर्गा देवीचे सातवे रुप ज्याचे नाव आहे कात्यायनी, याचे प्रसिद्ध मंदिर कर्नाटकातील अंकोलाजवळ अवेर्सा येथे वसले आहे. त्याचबरोबर मथुरा येथे भूतेश्वरमध्ये कात्यायनी वृंदावन शक्तीपीठ आहे. मान्यता आहे की, या ठिकाणी देवी सतीचे केस पडले होते. ऋषि कात्यायन यांची पुत्री असल्याकारणाने देवीला कात्यायनी हे नाव पडल्याचे सांगितले जाते.

देवी कालरात्रि मंदिर, वाराणसी

कालरात्री हे देवीचे सातवे रुप आहे ज्याचे मंदिर देखील तुम्हाला वाराणसी या ठिकाणी पाहायला मिळेल. देवीचे हे रुप संकटाचा विनाश करण्यासाठी लोकप्रिय आहे. या रुपात देवीने अनेकदा राक्षसांचा वध केला होता ज्यामुळे तिला कालरात्रि हे नाव पडले. या देवीची पूजा ही रात्रीच केली जाते.

Navratri 2026: नवरात्रीत उपवास करताय? ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या …

देवी महागौरी मंदिर, लुधियाना

देवी मातेचे हे रुप शुभ्र पांढऱ्या रंगात आहे आणि म्हणूनच तिला महागाैरी हे नाव पडले. आठव्या रुपातील देवीचे हे मंदिर पंजाब राज्यातील लुधियाना या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच उत्तर प्रदेशातील वारणसीमध्येही महागौरीचे एक मंदिर वसले आहे. असे मानले जाते की, शिवाच्या प्राप्तीसाठी तप करताना देवीचा रंग काळा पडला होता, तथापि आदिदेव शंकराने पुन्हा देवीचा रंग पांढरा केला.

देवी सिद्धिदात्री मंदिर, सतना

शेवटचे आणि देवीचे नववे रुप आहे सिद्धिदात्री. मध्य प्रदेशातील सतना येथे देवीच्या नवव्या रुपाचे म्हणजेच सिद्धिदात्रीचे मंदिर पाहायला मिळते. छत्तीसगढमधील देवपहाडी या ठिकाणीही देवीचे मंदिर आहे. देवीच्या या रूपाची पूजा केल्याने भक्ताला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात असे मानले जाते. यावरुन या देवीच्या या रिुपाचे नाव सिद्धिदात्री असे पडले आहे.

Web Title: Navratri 2026 navdurga nine forms of goddess nine famous temples in india nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • Navratri
  • Navratri 2026
  • travel news

संबंधित बातम्या

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी  ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क
1

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क

Navratri: नवरात्रीत घरात ‘ही’ रोपं लावणे मानले जाते शुभ; देवीच्या आशीर्वादाने अडचणी होतील दूर
2

Navratri: नवरात्रीत घरात ‘ही’ रोपं लावणे मानले जाते शुभ; देवीच्या आशीर्वादाने अडचणी होतील दूर

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली
3

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत
4

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.