नवरात्र 2023 : नवरात्रीचा महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाची बहुतेक हिंदू घराण्यांनी आधीच मोठ्या उत्साहामध्ये तयारी सुरु केली आहे. नवरात्र म्हणजे ‘नऊ रात्री’. ‘नव’ म्हणजे ‘नऊ’ आणि ‘रात्री’ म्हणजे ‘रात्र’. यावर्षी शारदीय नवरात्री २०२३ रविवार, १५ ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि मंगळवारी, २४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
नवरात्रीचा महोत्सव हा एक शुभ सण मानला जातो. कारण देवी दुर्गेने महिषासुर या राक्षसाचा पराभव करून त्याचा वध केला आणि दुष्ट शक्तीपासून जगाचे रक्षण केले. देवी दुर्गा दैवी शक्ती, सामर्थ्य आणि बुद्धीचे प्रतीक आहे ज्याचा उपयोग वाईट विरुद्ध लढण्यासाठी केला जातो. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या रूपाची पूजा केली जाते. दिवसांशी संबंधित रंगांचे कपडे घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
नवरात्रीचा पहिला दिवस – शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापनासोबत शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. देवीला केशरी रंग आवडतो. केशरी रंग ऊर्जा आणि आनंदाची भावना देतो. केशरी रंग सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो.
नवरात्रीचा दुसरा दिवस – १६ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी आईला समर्पित केला जाईल. त्यामुळे पांढरे वस्त्र परिधान करून पूजा केल्याने देवीसोबतच भोलेनाथचा आशीर्वाद प्राप्त होतो. श्वरंग हे पवित्रता आणि शांतीचे प्रतीक आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.
नवरात्रीचा तिसरा दिवस – १७ ऑक्टोबर रोजी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ राहील. लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो. हा लाल रंग शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
नवरात्रीचा चौथा दिवस – १८ ऑक्टोबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा करा. असे मानले जाते की हा रंग अतुलनीय आनंदाची भावना देतो. यामुळे समृद्धी वाढते.
नवरात्रीचा पाचवा दिवस – १९ ऑक्टोबरला पिवळा रंग परिधान करून आई स्कंदमातेची पूजा करणे खूप शुभ राहील. पिवळा रंग धारण केल्याने पूजन केल्याने सौभाग्य प्राप्त होते.
नवरात्रीचा सहावा दिवस – २० ऑक्टोबर रोजी माता कात्यायनीची पूजा केली जाईल. या दिवशी भक्तांनी हिरवा रंग परिधान केल्याने प्रगतीचा मार्ग खुला होईल. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे. यामुळे सुखी वैवाहिक जीवन आणि संतती वाढीचे आशीर्वाद मिळतात.
नवरात्रीचा सातवा दिवस – २१ ऑक्टोबर रोजी माँ कालरात्रीच्या पूजेमध्ये राखाडी रंग परिधान करा. नवरात्रीमध्ये राखाडी रंगाची पूजा केल्याने दुष्टांचा नाश होतो.
नवरात्रीचा आठवा दिवस – २२ ऑक्टोबर रोजी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवी महागौरीची पूजा करा. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होते.
नवरात्रीचा नववा दिवस – २३ ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी मोरपंखी हिरव्या रंगाचा वापर करा. मोर हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो.