
Navratri 2024 : गरबा खेळण्यासाठी चेहऱ्यावर ग्लो हवाय ? मग 'असा' बनवा ग्रीन टी चा फेसपॅक, होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
तुमच्या त्वचेचा रंग कोणताही असो पण तुमची पण त्वचा मुलायम आणि नितळ असणं खूप महत्वाचं असतं. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि बाहेरील वातावरणातील प्रदुषणाचा गंभीर परिणाम त्वचेवर मोठ्या प्रमाणात होतो. सूर्याच्या अतीनील किरणांप्रमाणे हवेत पसरलेल्या केमिकलच्या धुरामुळे त्वचा कोरडी पडणं, जळजळ होणं यांसारख्या समस्या वाढत आहे. परिणामी कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. म्हणूनच बरेचजण जाहिराती पाहून किंवा पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटवर खर्च करतात. मात्र या ट्रीटमेंटचा कालांतराने शरीरावर गंभीर परिणाम होतो. म्हणूनच रासायनिक पेक्षा नैसर्गिक क्रिया करुन बनवलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा जास्तीत जास्त वापर करणं फायदेशीर आहे. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी योग्य आहाराबरोबरच वापरण्यात येणारे प्रॉडक्टसुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. म्हणूनच पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी फेसपॅक तयार करु शकता.
हेही वाचा- नवरात्रीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, वाचा सोपी रेसिपी
सध्या नवरात्री निमित्ताने गरबा खेळण्यासाठी किंवा तुम्हाला एरवी पार्टीसाठी तयार चेहऱ्य़ावर छान ग्लो हवाय तर मग तुम्ही फेसपॅकसाठी ग्रीन टीचा वापर करु शकता. ग्रीन टी प्यायल्याने जसं वजन कमी होतं तसंच त्वचेसाठी देखील ग्रीन टी फायदेशीर आहे.
कसा बनवायचा ग्रीन टीचा फेसपॅक ?
1) एक चमचा ग्रीन टी पावडर आणि एक चमचा मध व दही यांची पेस्ट करा आणि चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे त्वचा मुलायम होते.
हेही वाचा- पपई खाल्ल्याने होणारे फायदे तुम्हाला माहिती आहे का?
2) जर तुमच्या चेहऱ्याची आग होत असेल किंवा मुरुम आले असतील तर ग्रीन टी फेसपॅक रामबाण उपाय आहे. एक चमचा ग्रीन टी, चंदन पावडर, मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करा. तयार झालेल्या पेस्टने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. ग्रीन टी स्क्रबचं काम करतं. यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो. त्याचबरोबर मुरुम निघून जाण्यास देखील मदत होते.
3)ग्रीन टी मध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणत असतं. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा त्यानंर ग्रीनटी चं पाण्य़ाने चेहऱ्य़ाला मालिश करा. यामुळे त्वचेला पोषक तत्व मिळतात. त्वया त्वचा नितळ आणि सुंदर दिसते.