गुलाबी मदुराई कॉटन साडी आणि क्लासी दागिने, Nita Ambani यांचा एलिगंट लुक
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी त्यांच्या फॅशनमुळे कायमच सगळीकडे चर्चेत असतात. त्यांचे इंडियन, वेस्टन, ट्रॅडीशन लुक सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यांच्या लुकची कायमच सगळीकडे मोठी चर्चा असते. नुकताच मुंबईमध्ये एका नवीन स्वदेश स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. या स्टोरच्या उदघाटनाला नीता अंबानी यांनी त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि सुना श्लोका मेहता, राधिका मर्चंट यांच्यासह हजेरी लावली होती. नीता अंबानी यांनी कार्यक्रमासाठी पारंपरिक शैलीतील साडीची निवड केली होती. उदघाटन सोहळ्यात परिधान केल्याला साडी आणि दागिन्यांची सगळीकडेच मोठी चर्चा आहे. नीता अंबानी यांनी खास प्रसंगी निवडलेल्या साडीवर पिढ्यानपिढ्या कुटुंबात जतन केलेले आणि वारसाहक्काने बनवलेले दागिने परिधान केले होतो. आज आम्ही तुम्हाला उदघाटन सोहळ्यात नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या साडीची आणि दागिन्यांची काही खास वैशिष्ट्य सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – instagram)
नीता अंबानी यांनी मधुराई कापसापासून बनवलेल्या मऊ-लालसर गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. नाजूक भरतकाम केलेल्या बॉर्डर्स आणि सोन्याच्या बारीक स्पर्शांमुळे साडी आणखीनच उठावदार आणि सुंदर दिसत होती. क्लासिक सीधा पल्लू ड्रेपमध्ये त्यांनी गुजरातच्या पारंपारिक कापड वारशाचे कौतुक केले. राजकोट येथील कारागीर श्री राजश्रुंदर यांनी 10 महिने हाताने विणकाम करत साडी तयार केली आहे.हातमागावर तयार करण्यात आलेल्या साड्या अतिशय पारंपरिक आणि सुंदर लुक देतात.नीता अंबानी यांची साडी सेलेब्रिटी स्टयलिश मनीष मल्होत्रा यांनी स्टाईल केली आहे.
मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली ही साडी फिरोझी निळ्या रेशमी कंचली ब्लाउजसोबत नीता अंबानी यांनी परिधान केली. तयार करण्यात आलेल्या ब्लॉउजवर प्राचीन धाग्यांचे विणकाम आणि विंटेज राजेशाहीचा एक वेगळाच लुक देण्यात आला आहे. साडीवरील लुक आणखीनच खास आणि उठावदार दिसण्यासाठी वारसाहक्काने तयार केलेले पारंपरिक दागिने परिधान केले होते. तसेच त्यांनी डाव्या हातामध्ये सोन्याचे बाजूबंद परिधान केले आहे. त्यावर अतिशय नाजूक नक्षीकाम करून छोटासा घुंगरू सुद्धा लावण्यात आला आहे. नीता अंबानी यांच्या पणजीकडून मिळालेला बाहुलाचा पट्टा त्यांनी परिधान केला आहे. मात्र हे दागिने आता मुलगी ईशा अंबानी यांच्याकडे दिले जाणार आहेत.
नीता अंबानी यांच्या लुकमध्ये भर घालणारा सुंदर दागिना म्हणजे त्यांचा राजेशाही हार. त्यांनी परिधान केलेल्या नेकलेसवर पांढऱ्या रंगाचे खड्डे आहेत. त्यांचा हार पांढऱ्या सोन्याने मढवलेले आहे आणि भगवान श्रीनाथांच्या जीवनातील दिव्य क्षणांचे चित्रण करण्यासाठी नेकलेस हाताने रंगवलेले होता. हिऱ्यांनी जडलेले कानातले आणि मनगटांवर लावलेल्या नाजूक गुलाबी बांगड्यांमुळे तिचा जातीय लूक आणखीनच उठावदार दिसत आहे. गुलाबी मदुराई साडीवर त्यांनी गुलाबी आयशॅडो, विंग्ड आयलाइनर, मस्कारा-कोटेड पापण्या, चमकदार हायलाइटर आणि चमकदार गुलाबी लिपस्टिक लावली आहे. त्यांचा लुक आणखीनच परिधान करण्यासाठी गुलाबी बिंदी लावून लुक स्टाईल केला आहे.