सणांचा महिना म्हणून श्रावणाची खास ओळख आहे. कारण याच महिन्यात मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन आणि इतरही सण असतात. सण म्हंटल की सर्वच महिला सुंदर साडी आणि दागिने घालून तयार होतात. तसेच श्रावणात येणाऱ्या मंगळागौरीची सर्वच महिलांमध्ये मोठी उत्सुकता असते. या दिवशी देवीची मनोभावे पूजा करून नंतर वेगवेगळे धर्मपरिक खेळ खेळले जातात. तसेच मंगळागौरीसाठी अनेकजणी पारंपरिक नऊवारी साडी नेसण्यास जास्त प्राधान्य देतात. मात्र नऊवारी साडीवर नेमका कोणत्या पॅटर्नचा ब्लाऊज शिवावा? हे बऱ्याचदा सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नऊवारी साडीवरील ब्लाऊजच्या काही सुंदर डिझाईन्स सांगणार आहोत. या नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य – pintrest)
मंगळागौरीला नऊवारी साडी नेसायची आहे? मग 'या' पॅटर्नचे शिवा सुंदर डिझायनर ब्लाऊज
हल्ली स्टोन वर्क, आरी वर्क आणि मशीन वर्क करून बनवलेल्या ब्लाऊजची मोठी क्रेझ आहे. मागील गळ्याला कोणत्याही सुंदर आणि सिंपल पॅटर्न शिवून त्यावर स्टोन वर्क करू शकता.
नऊवारी साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने पारंपरिक लुक केला जातो. त्यामुळे तुम्ही बंद गळ्याचे सुंदर ब्लाऊज शिवून त्यावर नथ किंवा इतर डिझाईनचे आरी वर्क करून घेऊ शकता.
रंगीत खड्यांचे स्टोन वर्क करून शिवलेला ब्लाऊज नऊवारी साडीची शोभा वाढवेल. नऊवारी साडीवर लुक आणखीनच उठावदार करण्यासाठी तुम्ही पेशवाई लुक करू शकता.
चारचौघांमध्ये उठावदार आणि युनिक दिसण्यासाठी तुम्ही ब्लाऊजवर हाताने काढलेले पेंटिंग करून घेऊ शकता. या पद्धतीचे ब्लाऊज कोणत्याही साड्यांवर सुंदर दिसतात.
काहींना खूप जास्त साधे आणि सिंपल ब्लाऊज परिधान करायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे नऊवारी साडीचा काठ वापरून तुम्ही ब्लाऊजच्या हातांना किंवा कंबरेला लावू शकता.