
कुणाचीच हिंमत नाही या ठिकाणांना भेट देण्याची... चुकूनही इथे कोणी जात नाही; भारताच्याही एका ठिकाणचा समावेश
“माणसाला नेहमी अनोळखी आणि न दिसणाऱ्या गोष्टी आकर्षित करतात. मग त्या कोणत्या गूढ शक्ती असोत किंवा अजाणलेल्या ठिकाणी. जगात काही ठिकाणे अशी आहेत जी त्यांच्या धोकादायक आणि रहस्यमय स्वभावामुळे आजही लोकांसाठी एक कोडे ठरली आहेत. अनुभवी प्रवासी आणि संशोधकसुद्धा अशा ठिकाणी जाण्यापूर्वी अनेकदा विचार करतात. चला तर जाणून घेऊया जगातील काही अत्यंत रहस्यमय आणि धोकादायक स्थळांबद्दल.
भारतात या ठिकाणी वाहतात 17 नद्या, शांततेच वातावरण अनुभवायचं असेल तर नद्यांच्या शहरांना जरूर भेट द्या
वेले दो जावारी, ब्राझील
अमॅझॉनच्या दाट जंगलांच्या मध्यभागी वसलेला हा प्रदेश सुमारे ३३,००० चौरस मैलांमध्ये पसरलेला आहे, जो आकाराने जवळजवळ ऑस्ट्रियाएवढा मोठा आहे. येथे सुमारे १९ आदिवासी जमाती राहतात. या भागातील घनदाट जंगल, नद्या आणि कठीण भौगोलिक रचना यामुळे बाहेरील लोकांसाठी येथे पोहोचणे फार अवघड आहे. स्थानिक जमाती आपली भूमी आणि जीवनशैली जपण्यासाठी बाहेरील लोकांना आत येऊ देत नाहीत. त्यामुळे येथे प्रवास करणे फक्त शारीरिकदृष्ट्या कठीणच नाही, तर कायदेशीर दृष्ट्याही पूर्णपणे बंदी घालण्यात आलेले आहे.
सॅंडी बेट, दक्षिण पॅसिफिक महासागर
काही ठिकाणांचे गूढ त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. सॅंडी बेट असेच एक रहस्यमय ठिकाण होते, जे वर्षानुवर्षे समुद्री आणि जागतिक नकाशांवर तसेच गूगल मॅप्सवरही दिसत असे. असे म्हटले जात होते की हे बेट ऑस्ट्रेलिया आणि न्यू कॅलेडोनियाच्या दरम्यान आहे. मात्र, वैज्ञानिकांनी प्रत्यक्ष तपासणी केल्यावर असे आढळले की तिथे काहीच नव्हते. हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही की हे फक्त नकाशावरील एक चूक होती की खरोखरच एक दिवस हे बेट रहस्यमयरीत्या अदृश्य झाले.
पॅटागोनिया, अर्जेंटिना आणि चिली
दक्षिण अमेरिकेच्या टोकाशी पसरलेला पॅटागोनिया प्रदेश आपल्या विशाल हिमनद्या, घनदाट वर्षावने आणि बर्फाच्छादित पर्वतरांगांसाठी प्रसिद्ध आहे. या प्रदेशाचे दुर्गम स्थान आणि अत्यंत कठीण हवामानामुळे याचा बराचसा भाग आजही नकाशांवर तपशीलवार दाखवता येत नाही. येथे संशोधन करणे किंवा सर्वेक्षण करणे अत्यंत जोखमीचे असते. अचानक बदलणारे हवामान, हिमवादळे आणि खडबडीत भूभाग हे सर्व मिळून पॅटागोनियाला आजही एक गूढ आणि आव्हानात्मक प्रदेश बनवतात.
नॉर्दर्न फॉरेस्ट कंप्लेक्स, म्यानमार
म्यानमारच्या उत्तर भागात असलेला हा वनक्षेत्र जगातील काही दुर्मीळ वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे आश्रयस्थान आहे. मात्र, झपाट्याने होत असलेली वनोंत्पादनाची प्रक्रिया या परिसरासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. येथे रस्ते, सुविधा आणि संपर्क माध्यमांचा अभाव असल्यामुळे संशोधकांसाठी या भागाची निगराणी किंवा अभ्यास करणे जवळजवळ अशक्य झाले आहे.
हनिमूनसाठी युरोपला जाण्याचं बजेट नाही? तर आता टेन्शन नको, भारतातील ही ठिकाणं देतात विदेशी वाइब
नॉर्थ सेंटिनल बेट, भारत
जगातील सर्वात रहस्यमय आणि धोकादायक ठिकाणांपैकी एक म्हणजे नॉर्थ सेंटिनल बेट. हे बंगालच्या उपसागरात, अंडमान बेटसमूहाचा भाग आहे. येथे सेंटिनलीज ही आदिवासी जमात राहते, जी आधुनिक जगापासून पूर्णपणे वेगळी आहे. ही जमात बाहेरील लोकांशी कोणताही संपर्क साधण्यास कटाक्षाने विरोध करते आणि आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही मर्यादा पार करू शकते. त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रत्येक प्रयत्न हिंसा आणि प्रतिकाराने संपले आहेत. त्यामुळे हे बेट आजही मानवी सभ्यतेसाठी एक गूढ आणि अगम्य ठिकाण मानले जाते.