Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूंनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? शरीरात नक्की कोणते बदल होत असतात? जाणून घ्या

एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाले तरी त्याच्या शरीरातील अवयव हे कार्यरत असतात. माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील अवयव नक्की किती काळापर्यंत कार्यरत असतात तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक अवयव हा मृत्यूनंतर विशिष्ट काळापर्यंत काम करत असतो . कोणता अवयव किती काळ जिवंत असतो याविषयी सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2024 | 11:36 AM
मृत्यूंनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? शरीरात नक्की कोणते बदल होत असतात? जाणून घ्या

मृत्यूंनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? शरीरात नक्की कोणते बदल होत असतात? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

असे म्हणतात की, मासाच्या जन्माबरोबरच त्याचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्यावर अंत्यसंस्कार विधी केले जातात किंवा त्याला दफन केले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? माणसाच्या मृत्यूंनंतरही त्याच्याशरीरातील काही अवयव जिवंत असतात. व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी सर्व अवयव हे एकदम निकामी होत नाहीत, काही अवयवांचे कार्य हे व्यक्तीच्या मृत्यूनंतरही काही मिनिटे किंवा काही तासांपर्यंत सुरू असते. मात्र हे अवयव ठराविक वेळेपर्यंत काम करत असतात. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही तज्ज्ञ डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. याविषयीच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात टप्प्याटप्प्याने बदल होत जातात. हृदयाची धडधड थांबते, ऑक्सिजन न मिळाल्याने शरीरातील अवयव आणि पेशी निकामी होऊ लागतात. नोएडामधील यथार्थ हॉस्पिटल एक्स्टेंशनच्या पॅथॉलॉजीचे संचालक आणि एचओडी यांच्या मते, मृत्यूंनंतर व्यक्तीच्या अवयवांचे विघटन होण्यास सुरुवात होते. काही मिनिटांच्या आत पूर्णपणे ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या मेंदूच्या पेशींचे कार्य सामान्यतः 3-7 मिनिटांच्या आत पूर्णपणे बंद होते. यकृत अधिक लवचिक असल्याने मृत्यूनंतर तासाभरात त्याचे कार्य बंद होते. यादरम्यान रक्त जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे शरीराचा रंग बदलतो, ज्याला लिव्हर मॉर्टिस असे म्हटले जाते.

हेदेखील वाचा – करीना कपूरच्या सुंदर त्वचेचे रहस्य आले समोर, 44 व्या वर्षीही त्वचा नितळ ठेवण्यासाठी करते ‘या’ टिप्सचा वापर

मृत्यूनंतर काही मिनिटांतच निकामी होणारे अवयव

  • हृदय – मृत्यूनंतर त्वरित धडधडणे बंद होते
  • फुफ्फुस – काही वेळातच श्वास घेणे थांबवते, ज्यामुळे संपूर्ण शरीराचा ऑक्सिजनचा पुरवठा थांबते
    मेंदू – ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूच्या पेशी 3-7 मिनिटांत मरतात
  • रक्त – रक्ताभिसरणाच्या कमतरतेमुळे रक्त एकाजागी जमा होण्यास आणि स्थिर होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे शरीराचा रंग फिका पडू लागतो

हेदेखील वाचा – जपानचे लोक रोज या गोष्टी फॉलो करून जगतात 100 वर्ष आयुष्य, दीर्घकाळ राहतात फिट आणि स्लिम

मृत्यूनंतर काही तासांत निकामी होणारे अवयव

  • त्वचा – रक्ताभिसरण प्रक्रिया थांबते ज्यामुळे त्वचेचा रंग बदलू लागतो
  • स्नायू – लवचिकता कमी होते आणि तासाभरात स्नायू कडक होण्यास सुरुवात होते
  • यकृत – जवळपास एक तासाने यकृताचे चयापचय कार्य थांबते

मृत्यूनंतर 6-7 तासांनी निकामी होणारे अवयव

  • डोळे – मृत्यूनंतर डोळे सहा अवघ्या तासांपर्यंत जिवंत असतात
  • स्नायू – स्नायू कडक होण्यास सुरुवात होते. विशेषतः पापण्या आणि जबड्यांसारखे लहान स्नायू अधिक कडक होऊ लागतात

मृत्यूनंतर 6-12 तासांनी निकामी होणारे अवयव

  • स्नायू – 6-12 तासांमध्ये शरीरातील संपूर्ण स्नायू ताठ होतात. यातही मोठे अवयव म्हणजे हात, पाय अधिक ताठ होतात
  • पाचक प्रणाली – पोटातील पाचक एंजाइम ऑटोलिसिस नावाच्या प्रक्रियेत ऊतींचे विघटन होत असते

Web Title: Organs death time from the heart to skin and digestive system what happens to our bodies after we die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • Human body

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.