फोटो सौजन्य - Social Media
सध्याच्या व्यस्त जीवनात, लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे विसरून गेले आहेत, ज्यामुळे त्यांच्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासू लागते. यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे लोक आजकाल कमी वयातच अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपण आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामध्ये भरपूर पोषकतत्वे असतात. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक बियांमध्येही भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येत असतात, ज्यामुळे यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरत असते.
निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करू शकता. सूर्यफुलाच्या बिया भरपूर प्रमाणात खाव्यात, या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. सूर्यफुलाच्या बियांना सुपरफूड मानले जाते कारण ते आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबीने समृद्ध असतात. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात या बियांचा समावेश करू शकता.
बियांमध्ये आढळून येतात अनेक पोषक घटक
पोषणतज्ञ डॉ. कनिका सचदेव यांच्या मते, सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, तांबे, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे चांगल्या प्रमाणात आढळतात. या बिया शरीराला ऊर्जा देतात तसेच अनेक आजारांपासून संरक्षण करतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण चांगले असते, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. या बिया महिला आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहेत. सूर्यफुलाच्या बिया हृदयासाठी फायदेशीर असतात कारण त्यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. या बिया कोलेस्टेरॉलची पातळीही कमी करू शकतात.
मेंदूचे आरोग्य सुधारते
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटी-इंफ्लेमेटरी एजंट म्हणून काम करते, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते आणि शरीर निरोगी ठेवते. सूर्यफुलाच्या बिया मेंदूचे आरोग्य सुधारण्यास सक्षम असतात. त्यात असलेले व्हिटॅमिन ई मेंदूच्या पेशी आणि न्यूरॉन्सचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते. या बियांचे सेवन केल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिडही मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. या बिया पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात आणि त्वचाही निरोगी बनवण्यास मदत करतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.