
लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
मे महिन्यांच्या सुट्टीनंतर जूनमध्ये सर्वच मुलांची शाळा सुरु होते. दोन महिन्यांच्या मोठ्या सुट्टीनंतर अनेक मुलांना शाळेत जायला कंटाळा येतो. दिवसभर घरी राहून तासनतास बाहेर जाऊन खेळणे, मोबाईल बघणे, टीव्ही बघणे इत्यादींचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यानंतर जूनमध्ये शाळा सुरु झाल्यावर मुलांना शाळेत जायचा कंटाळा येतो. अशा वेळी पालक मुलांना लाडीगोडी लावून शाळेत पाठवतात. त्यामुळे मुलांचे अभ्यासामध्ये सुद्धा लक्ष लागत नाही. अभ्यास करण्याचा कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे तुमची मुलं शाळेत जाण्यासाठी कंटाळा करत असतील तर या टिप्स नक्की वापरून पहा. यामुळे तुमच्या मनात मुलांबद्दल असलेली भीती कमी होईल.
अनेकदा आईवडील आपल्या मुलांची तुलना इतर मुलांसोबत करतात. असे केल्याने मुलांमधील आत्मविश्वास कमी होण्यास सुरुवात होते. या सर्व गोष्टींचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्यानंतर मुलं अभ्यासापासून दूर पळू लागतात. काही पालक मुलांना बाहेर खेळण्यासाठी खूप कमी वेळ देतात. त्यांना कुठेबाहेर जाऊ देत नाही, अशावेळी मुलं जास्त चिडचिडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या मुलांचा हट्टीपणा कमी होईल.(फोटो सौजन्य-istock)
लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा
अनेकदा आपल्या मुलांची तुलना इतर मुलांसोबत करतात. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे पालकांनी संयम बाळगून आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुले त्यांच्या कुवतीप्रमाणे अभ्यास करत असतील तर त्यांच्या प्रगतीमध्ये अजून कशी वाढ होईल याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यासोबत प्रेमाने बोलून अभ्यास करून घ्यावा.
हे देखील वाचा: शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात का ‘या’ फळांचा समावेश
मुलं पुस्तक वाचण्यासाठी बसल्यानंतर किंवा अभ्यास करताना त्यांना जमत नसलेल्या गोष्टी समजून सांगाव्यात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढत जातो. घरात नेहमी आनंदाचे वातावरण असणे गरजेचे आहे. अभ्यास करताना त्यांच्या शंकेचे निरसन केल्यास त्यांना अभ्यास करणं आवडू लागेल.
लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा
लहान मुलांचे कौतुक केल्यानंतर त्यांना नवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. नवीन गोष्टी शिकणे आवडू लागते. लहान मुलांचे कौतुक करून प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे.
हे देखील वाचा: कितीही खाल्ले तरी वजन राहील आटोक्यात फक्त कोमट पाण्यात मीठ आणि ‘या’ बियांची पूड घाला
लहान मुलांना कशात आवड आहे याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. अनेकदा मुलांवर एखादी गोष्टी शिकण्यासाठी पालक जबरदस्ती करतात, पण ती गोष्ट मुलांना करायची नसते. अशावेळी पालकांनी आरडाओरडा न करता शांत राहून मुलांना समजवण्याचा प्रयत्न करावा.