स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
राज्य सरकारने 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमरावती विभागातील जिल्हा परिषदेच्या 1068 शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
देशातील एकूण ६३ जिल्ह्यांमधील अंगणवाड्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुले कुपोषित असल्याचं आढळून आलं आहे. त्यापैकी ३४ जिल्हे एकट्या उत्तर प्रदेशमधील आहेत. हे धक्कादायक वास्तव रिपोर्टमधून समोर आलं आहे.
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील हाबूर गावातील राजकीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांवर कोसळलं. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर एक शिक्षक गंभीर जखमी आहे.
संपूर्ण देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड राज्यात देखील दमदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम जारी केले आहे. शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी घेणे बंधनकारक आहे. तसेच चालकांची पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे.
कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सप्तश्रृंगी इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका शाळेची भिंत कोसळली आहे. कल्याणच्या केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू…
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात एक दुःखद आणि काळीज चिरणारी घटना घडली आहे. मुलांची शाळेत खराब कामगिरी नव्हती. त्यामुळे एका बापाने त्यांच्या ६ आणि ७ वर्षांच्या दोन्ही मुलांची बादलीत बुडवून हत्या…
शालेय विद्यार्थांसाठी एक मोठी बातमी आहे. यापुढे सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत पास व्हावं लागणार आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसाव लागणार आहे.
दोन महिन्यांच्या मोठ्या सुट्टीनंतर अनेक मुलांना शाळेत जायला कंटाळा येतो. दिवसभर घरी राहून तासनतास बाहेर जाऊन खेळणे, मोबाईल बघणे, टीव्ही बघणे इत्यादींचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यानंतर जूनमध्ये शाळा…
'अवनि' संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 11 साखर कारखाने व 8 वीटभट्ट्यांवर 4 ते 18 वयोगटातील 1,865 शाळाबाह्य बालके आढळून आली आहेत. यापैकी बहुतांश बालकांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळवून देऊन…
पुण्यातील वाडिया महाविद्यालयातर्फे गेल्या अनेक वर्षापासून शालेय स्तरावरील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र 'प्रज्ञा शोध परीक्षेत' यावर्षी मुरबाड येथील एस व्ही शेट्टी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी…
दहावी आणि बारावीच्या परीक्षा आधी नियोजित वेळेनुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य माध्यमिक आणि मंडळाने जाहिर केले हाेते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतच त्यांना परीक्षा…