निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात प्रोटीन युक्त पदार्थ खाणे फार गरजेचे आहे. शरीराला सर्वच पदार्थांची आवश्यकता असते. आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने दात, नख आणि हाड निरोगी राहतात. तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढून आरोग्य सुधारते. रोजच्या आहारात डाळी, चीज, बीन्स, हरभरा, मांस किंवा चिकन इत्यादी पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला प्रोटीन मिळते. पण काही लोक मांसाहारी पदार्थ खात नाहीत. अशा लोकांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता जाणवते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोजच्या आहारात कोणती प्रोटीनयुक्त फळे खावीत याबद्दल सांगणार आहोत. ही फळे खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन वाढेल.(फोटो सौजन्य-istock)
प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी 'ही' फळे खावीत

अनेक लोक सर्दी होईल म्हणून पेरू खाणे टाळतात. पण पेरूमध्ये विटामिन सी, पोटॅशियम, फायबर आणि प्रथिने असतात. यामध्ये कमी फॅट आणि कॅलरीज कमी असते.

बेरीजमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज, विटामिन सी आणि बी6 आढळून येतात. यामध्ये उच्च प्रथिने आढळून येतात, जी शरीरासाठी आवश्यक आहेत.

एवोकॅडोमध्ये पोटॅशियम, प्रथिने मुबलक प्रमाणात आढळून येतात. तसेच यामध्ये त 20 पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे रोजच्या आहारात एव्हाकाडोचे सेवन करावे.

किवीमध्ये कमी प्रमाणात प्रथिने आढळून येतात. पण ही प्रथिने शरीरासाठी आवश्यक आहेत. किवालिन आणि किस्पर नावाची विशेष प्रथिने किवीमध्ये मुबलक प्रमाणात आढळून येतात.

लोहाने समृद्ध असलेल्या डाळिंबाचे सेवन केल्याने आरोग्याला फायदे होतात. यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे शरीरातील पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात.






