फोटो सौजन्य - Social Media
आजच्या जगामध्ये अनेक जण डोळ्यांच्या दृष्टीतील त्रासामुळे कंटाळून गेले आहेत. अगदी शाळेत जाणारी लहान मुलांनीही मोठ्या नंबरचा चष्मा दिसतो. जवळजवळ सगळ्याच पिढींमध्ये हा त्रास अगदी सामान्य होत चालला आहे. त्यामध्ये आजकालची सगळीच माणसे दिवसभर स्क्रीनच्या समोर असतात. याकारणाने याचा मोठा परिणाम डोळ्यांवर होतो. या वाढत्या त्रासाने शेवटी अंधुक दिसण्यास सुरुवात होते आणि डोळ्यांवर कायमचा चष्मा बसून जातो. परंतु, लोकांना या त्रासातून कायमची मुक्ती देण्यासाठी एंटोड फार्मास्युटिकल्स या कंपनीने पाऊल उचलले आहेत. एंटोड फार्मास्युटिकल्स या कंपनीने प्रेसव्यू आई ड्रॉप्सची निर्मिती केली आहे. मुळात, या डोळ्यांच्या ड्रॉप्सचा वापर प्रेस्बायोपिया असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे.
हे देखील वाचा : दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारी कल्लाडका चहा बनवण्याची सोपी रेसिपी; जाणून घ्या
प्रेस्बायोपिया एक डोळ्यांची स्थिती आहे किंवा एक विकार आहे. या स्थितीमध्ये लोकांना जवळच्या वस्तू पाहण्यास त्रास होतो. अशा लोकांना जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करता येत नाही. ही डोळ्यांची अगदी सामान्य स्थिती आहे. वयानुसार डोळ्यांच्या शक्तीत कमतरता होत जाते. अगदी वयाची चाळीशी ओलांडली कि प्रेस्बायोपियाला सुरुवात होते. वयाच्या ६० वर्षांपर्यंत प्रेस्बायोपिया वाढत राहतो. जगभरात सुमारे 109 ते 180 कोटी लोक प्रेस्बायोपिया या समस्येने त्रस्त आहेत.
Antode Pharmaceuticals ला Drug Controller General of India (DCGI) कडून अंतिम मान्यता मिळाली आहे. यापूर्वी, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या विषय तज्ञ समितीने (SEC) देखील या उत्पादनाची शिफारस केली होती. प्रेस्बायोपियाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हे औषध फार गुणकारी ठरणार आहे. डोळ्यांवरून कायमचा चष्मा निघण्याची देखील अपार शक्यता आहे.
हे देखील वाचा : Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी
मुळात हे भारतातील पहिले औषध आहे जे प्रेस्बायोपियाने त्रस्त व्यक्तींना चष्म्यापासून मुक्त करण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आले आहे. या ड्रॉप्सच्या वापराने प्रेस्बायोपियाने त्रस्त व्यंक्तींचा वाचण्यास त्रास तर दूर होईलच त्या बरोबर डोळ्यांना एक विशिष्ट चमकही देईल. या संशोधनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आले आहे. साधारपणे या ड्रॉपची किंमत ३५० रुपये असण्याचे सांगण्यात येत आहे.