कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या पद्धतीने तयार करा लसणीचे पाणी
शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, वाढलेले वजन, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात. चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये निरोगी पेशी तयार करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, तर शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
हातापायांमध्ये सतत वेदना होतात? मग वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन
वाईट कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहण्यास सुरुवात झाल्यानंतर रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात लसणीचे सेवन करावे. लसूण खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. लसणीमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी महत्वाचे आहे. लसूण खाल्यामुळे हृद्यासंबंधित समस्या कमी होऊन हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण पाकळीचा कशा प्रकारे वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लसूण खाल्यामुळे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन शरीर निरोगी राहते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणीच्या पाण्याचे सेवन करावे. लसणीचे पाणी अनेक आजारांवर प्रभावी आहे. उपाशी पोटी कच्च्या लसणीची सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पचनासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. लसूणीचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, 5 ते 6 कच्च्या लसूण बारीक चेचून घ्या. त्यानंतर एक ग्लास पाणी टोपात घेऊन त्यात बारीक करून घेतलेल्या लसूण टाकून व्यवस्थित मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं उकळवा. त्यानंतर तयार करून घेतलेले पाणी थंड करून प्या. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतील.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या पद्धतीने तयार करा लसणीचे पाणी
लसणीचे पाणी विषाणूविरोधी, बुरशीविरोधी, जीवाणूविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामध्ये असलेले विटामिन सी, विटामिन बी६ आणि फायबर इत्यादी घटक पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. कर्करोगाच्या जीवघेण्या आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा लसूणच्या पाण्याचे सेवन करा.
जेवणातील फोडणीचे पदार्थ बनवण्यासाठी लसणीचा वापर केला जातो. लसूण खाल्यामुळे अनेक गंभीर आजार बरे होतात. पूर्वीच्या काळापासून लसणीचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जात आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. याशिवाय कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रोज उपाशी पोटी लसणीचे सेवन करावे.
लसूण आणि मध हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मध आणि लसूण एकत्र खावी. एक पाकळी कच्च्या लसूणमध्ये थोडंसं मध टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सेवन करा. यामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.