पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या ३०० दिवस करतात मखाणाचे सेवन
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात बिहारमध्ये मखाणा बोर्ड स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मखाणा बोर्ड स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यात आली. 24 फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथे जाऊन शेतकऱ्यांच्या जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी भाषणात मोदी म्हणाले, मखाणा हे एक सुपरफूड आहे. हे जगाच्या बाजारपेठमध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, कमळाच्या बियांची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप प्रभावी आणि फायदेशीर ठरू शकते, असे मोदी म्हणले.(फोटो सौजन्य – iStock)
नरेंद्र मोदींनी देशाला केले मोठे आव्हान, लठ्ठपणा दूर करण्यासाठी सांगितले ‘हे’ प्रभावी उपाय
त्यानंतर पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “मी वर्षातील 365 दिवसांपैकी 300 दिवस मखाणा खातो. हा एक सुपरफूड आहे, जो जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावा लागतो. या वर्षीच्या अर्थसंकल्पात मखाणा उत्पादकांसाठी मखाणा मंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. हे मंडळ मखाणा उत्पादकांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करेल.
पंत्रप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज देण्यात आलेल्या किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचा बिहारमधील 75 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा झाला आहे. आज बिहारमधील शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1600 कोटी रुपये थेट पोहोचले आहेत. याशिवाय विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांना खतांसाठी लाठीमार करावा लागला. युरियाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला. परंतु एनडीएच्या राजवटीत गेल्या 10 वर्षांत शेतकऱ्यांना पुरेसा युरिया आणि डीएपी मिळत आहे. केंद्र सरकार 3000 रुपयांच्या खतावर अनुदान देऊन शेतकऱ्यांना 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत ते उपलब्ध करून देत आहे.
दैनंदिन आहारात मखाणा खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. मखाणापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. याशिवाय हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी मखाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी आहारात मखाणाचे किंवा मखाणापासून बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. मखाणामध्ये कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
हाडे दुखणे, हाडांमध्ये वेदना होणे, हाडे कमकुवत होणे, गुडघे दुखणे इत्यादी अनेक गंभीर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात नियमित मखाणा खावा. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. कॅल्शियम युक्त पदार्थांमध्ये आहारात प्रामुख्याने मखाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. मखाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे हाडांमध्ये निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित मखाणा खावा.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात मखाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी रिकाम्या पोटी मखाना खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ज्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. यामुळे अनेक वेगवेगळ्या आजारांपासून वाचण्यास मदत होते.