पायांमध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
भारतासह जगभरात हार्ट अटॅकमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या परिस्थितीला चुकीची जीवनशैली जबाबदार आहे. दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा चुकीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जंक फूडचे अतिसेवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, कामाचा तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय हल्लीची तरुण पिढी पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याऐवजी नियमित जंक फूडचे सेवन करू लागल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात हार्ट अटॅकचा धोका वाढल्यानंतर अनेक लक्षणे दिसू लागतात. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
नरेंद्र मोदींनी देशाला केले मोठे आव्हान, लठ्ठपणा दूर करण्यासाठी सांगितले ‘हे’ प्रभावी उपाय
तज्ज्ञांच्या मते, सायलेंट हार्ट अटॅक अतिशय धोकायदक आहे. कारण यामध्ये हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात सामान्य लक्षणे दिसू लागतात, जी ओळ्खणेसुद्धा कठीण होऊन जाते. मात्र शरीरात सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच हार्ट अटॅक येण्याआधी शरीरासह पायांमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधीच शरीरामध्ये अनेक सामान्य लक्षणे दिसू लागतात. यामध्ये 500 हुन अधिक महिलांचा समावेश आहे. 95 टक्के महिलांच्या शरीरात महिनाभर आधीच हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागतात. मात्र महिला कामाच्या धावपळीमध्ये या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे काहीवेळा मृत्यू होण्याची शक्यता असते. तसेच महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधी थकवा आणि झोपेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. तर इतर महिलांमध्ये छातीमध्ये दुखणे, छातीवर दाब आल्यासारखा वाटणे, वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरामध्ये थकवा येणे, झोप कमी लागणे, थकवा जाणवणे, सतत चिंता सतावणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा किंवा हात सुन्न होणे, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, भूक न लागणे, हात पायांना मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी सामान्य पण गंभीर लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
पोटावर वाढलेली चरबी वितळवण्यासाठी नियमित खा डार्क चॉकलेट! जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात खावे
हार्ट अटॅक येण्यापूर्वी सगळ्यात आधी पायांमध्ये लक्षणे दिसून येतात. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर पायांमध्ये पिवळेपणा जाणवू लागतो. कोलेस्ट्रॉल पूर्णपणे पायांमध्ये दिसू लागते. यामुळे पायांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. याशिवाय पायांना सूज येऊ लागते. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या कोलेस्टरॉलमुळे हृदयाकडून पायापर्यंत योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पोहचत नाही, ज्यामुळे हृदयविकाराचा झटक येण्याची शक्यता असते. कमी रक्त पोहचल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होण्यास सुरुवात होते.