
आतड्यांच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेला प्रभावी उपाय
कॅन्सर होण्याची कारणे?
आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे?
आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय खावे?
जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक कायमच जंक फूडचे सेवन करतात. याशिवाय अपुरी झोप, कामाचा वाढलेला ताण, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा थेट परिणाम शरीरावर होतो. तसेच तरुणांमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वीच्या काळी कॅन्सर किंवा हृद्यासंबंधित गंभीर आजार वयाच्या ५० व्या वर्षानंतर व्हायचे. पण हल्ली तरुण वयातील मुलांमुलींना सुद्धा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होते. शरीराच्या अंतर्गत अवयवांना कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. मात्र कालांतराने लक्षणे वाढतात आणि शरीराला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
सावधान! ‘इथे’ वाढतोय धोकादायक विषाणू, शरीरातील ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा, अन्यथा गमवाल जीव
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. तिखट, तेलकट तर लाल मांस वारंवार खाल्ल्यामुळे आतड्यांच्या कॅन्सरची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आतड्यांच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितलेल्या या पदार्थांचे नक्कीच आहारात सेवन करा. रोजच्या सवयी शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे कायमच हेल्दी आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात या पदार्थांचा नाक्कीच समावेश करा.
रोजच्या आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात मोड असलेली कडधान्ये खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा असंख्य फायदे होतात. बीन्स आणि विविध डाळींमध्ये केवळ प्रथिनेच नाहीतर रेझिस्टंट स्टार्च सुद्धा आढळून येतात. ज्यामुळे छोट्या आतड्यांमध्ये न पचन होता थेट मोठ्या आतड्यांमध्ये पचन होतात. रोज किमान १०० ग्रॅम कडधान्ये खावेत. यामुळे आतड्याना कधीही सूज येत नाही आणि आतड्यांच्या कॅन्सरचा धोका सुद्धा कमी होतो.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही किंवा ताक पिणे आवश्यक आहे. दही, ताक प्याल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. आंबवलेल्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स आढळून येतात. ज्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया निर्माण होण्यास मदत होते. चांगल्या बॅक्टरीयांची वाढ झाल्यामुळे कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींना वाढण्यास जागा मिळत नाही. शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक किंवा वाटीभर दही खावे.
जेवणाची चव वाढवण्यासाठी फोडणीत लसुणचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले सल्फर घटक आणि फ्लेव्होनॉइड्स घटक कॅन्सरपासून शरीराचा बचाव करतात. लसूण खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच आहारात वेगवेगळ्या पालेभाज्यांचे सुद्धा सेवन करावे. कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या भाज्यांमध्ये असलेले ‘सल्फोराफेन’ कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशी बाहेर काढून टाकतात.
Ans: कोलन किंवा मोठे आतडे हे पचनसंस्थेचा शेवटचा भाग आहे. या भागात होणाऱ्या कर्करोगाच्या गाठींना 'कोलन कॅन्सर' किंवा 'कोलोरेक्टल कॅन्सर' म्हणतात.
Ans: आतड्यांच्या सवयींमध्ये बदल, शौचातून रक्त पडणे
Ans: कौटुंबिक इतिहास, वाईट जीवनशैली, प्रक्रिया केलेले अन्न