Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCOS, Thyroid आणि एंडोमेट्रिओसिसची समस्या? गर्भधारणेपूर्वी महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी

महिलांना सध्या अनेक समस्या असतात. शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे वेळीच गर्भधारणा होत नाही आणि त्यात PCOS, थायरॉईड समस्या असतील तर गर्भधारणेपूर्वी तुम्ही काळजी घ्यायलाच हवी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 01, 2025 | 05:36 PM
काही आजार असल्यास गर्भधारणेत येतात समस्या (फोटो सौजन्य - iStock)

काही आजार असल्यास गर्भधारणेत येतात समस्या (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस किंवा थायरॉईडच्या समस्यांशी झुंजत असताना गर्भधारणा शक्य आहे का असा प्रश्न  प्रत्येक महिलेला पडतो. या परिस्थिती गर्भधारणा अधिक आव्हानात्मक ठरु शकते, परंतु योग्य वैद्यकीय उपचार, जीवनशैलीतील अचूक बदल आणि वेळीच उपचार केल्याने अनेक महिला यशस्वीरित्या गर्भधारणा करतात. डॉ. अवंतिका वझे – परब, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, वाशी, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

गर्भधारणेत येणाऱ्या समस्या

पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम), एंडोमेट्रिओसिस किंवा थायरॉईड विकार सारख्या आरोग्य स्थिती असलेल्या महिलांना गर्भघारणेत अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या हार्मोनल आणि प्रजनन आरोग्यासंबंधी समस्या ओव्हुलेशन प्रक्रियेत नकारात्मक परिणाम करतात तसेच ते अंड्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतात आणि सतत प्रयत्न करूनही गर्भधारणा करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरते. 

पीसीओएस अनेकदा तुमच्या मासिक पाळीच्या चक्रात व्यत्यय आणू शकते, परिणामी अनियमित मासिक पाळीची समस्या उद्भवते. यामुळे ओव्हुलेशन ट्रॅक करणे आणखी कठीण होते. एंडोमेट्रिओसिसमुळे प्रजनन अवयवांना जखम आणि सूज येऊ शकते. थायरॉईड विकारामुळे होणारे हार्मोनल असंतुलन, हायपोथायरॉईडीझम असो किंवा हायपरथायरॉईडीझम, केवळ प्रजननक्षमतेवरच नव्हे तर गर्भावरदेखील   आरोग्यावर देखील परिणाम करू शकते. म्हणूनच या आजार असलेल्या महिलांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. वेळीच निदान, वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने पालकत्वाचा प्रवास सुखकर करता येतो. गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना काय काळजी घ्याल? याबाबत अधिक माहिती घेऊया 

PCOS आणि थायरॉईडमध्ये काय आहे संबंध? कशी करावी चाचणी

प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घ्या

जर तुम्ही पालकत्वासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही प्रथम प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, विशेषतः जर तुम्हाला प्रजनन आरोग्यासंबंधी काही समस्या अथवा आजार असतील. प्रजनन तज्ज्ञ तुमच्या प्रजनन आरोग्याचे अचूक मूल्यांकन करतील, आवश्यक त्या चाचण्या करतील आणि तुमच्या शक्यता सुधारण्यासाठी प्रभावी उपचारांची शिफारस देखील करतील.

हार्मोन्सचे संतुलन 

दैनंदिन जीवनशैलीत छोटे बदल करून त्यांच्या हार्मोन्सचे नियमन करता येते. यामध्ये संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि तुमच्या हार्मोन्सची पातळी स्थिर करण्यासाठी तुमच्या तणावाच्या पातळीचे व्यवस्थापन करणे समाविष्ट असू शकते. नैसर्गिकरित्या तुमची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी हे आवश्यक आहे.

पीसीओएस नियंत्रण 

कृपया लक्षात ठेवा की पीसीओएससाठी कायमस्वरूपी उपचार नाही. तथापि, आहार आणि जीवनशैलीतील बदल ते नियंत्रणात ठेवण्यात लक्षणीय मदत करतील. नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि शरीराचे वजन नियंत्रित राखणे हे पीसीओएसशी संबंधित लक्षणे कमी करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.

PCOS आणि लठ्ठपणाशी निगडित समज आणि गैरसमज, काय सांगतात तज्ज्ञ

एंडोमेट्रिओसिसचे नियंत्रण करा

एंडोमेट्रिओसिस हे वेदनादायक मासिक पाळी, दीर्घकालीन ओटीपोटात होणाऱ्या वेदना आणि वंध्यत्वाशी संबंधित आहे. काही काळासाठी ते वैद्यकीयदृष्ट्या व्यवस्थापित केले जाऊ शकते परंतु बहुतेकदा लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रियेद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असाल, तर कृपया प्रजनन तज्ञांचा सल्ला घ्या कारण एंडोमेट्रिओसिस ही वारंवार होणारी स्थिती आहे आणि एंडोमेट्रिओसिसशी संबंधित वंध्यत्वासाठी अचूक व्यवस्थापन आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांची आवश्यकता भासते.

थायरॉईड पातळीचे निरीक्षण करा

जर तुम्हाला थायरॉईडचे निदान झाले तर T3, T4 आणि TSH सारख्या रक्त चाचण्यांच्या मदतीने तुमच्या थायरॉईड पातळीचे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे. थायरॉईड असंतुलन ओव्हुलेशन आणि गर्भघारणेवर नकारात्मक परिणाम करू शकते. नियमित तपासणी करून आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधे घेतल्याने तुमचे थायरॉईड कार्य संतुलित करण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Problems with pcos thyroid and endometriosis women should take care before pregnancy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • pregnancy health
  • pregnancy tips
  • thyroid care

संबंधित बातम्या

पावसाळ्यातील Hepatitis संसर्ग आणि गर्भधारणा; कोणता आहे धोका, तज्ज्ञांचे मत
1

पावसाळ्यातील Hepatitis संसर्ग आणि गर्भधारणा; कोणता आहे धोका, तज्ज्ञांचे मत

World IVF Day: तिशीत केले जाणारे आयव्हीएफ आणि 40 वयातील आयव्हीएफमधील फरक
2

World IVF Day: तिशीत केले जाणारे आयव्हीएफ आणि 40 वयातील आयव्हीएफमधील फरक

World IVF Day: आयव्हीएफ म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती
3

World IVF Day: आयव्हीएफ म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती

सकाळी झोपेतून उठल्यानंतर शरीरात दिसून येतात थायरॉइडची ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष न करता आरोग्याची घ्या काळजी
4

सकाळी झोपेतून उठल्यानंतर शरीरात दिसून येतात थायरॉइडची ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष न करता आरोग्याची घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.