Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan 2025 : सणाचा गोडवा आणखीन वाढेल, खास दिवशी भावासाठी घरीच बनवा मऊसर ‘मिल्क केक’

Milk Cake Recipe : रक्षाबंधन आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सणाच्या या सुंदर दिवशी तुम्हीही तुमच्या भावासाठी काही खास करु पाहत असाल तर घरीच भावासाठी मिल्क केक बनवणे एक चांगला पर्याय ठरु शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2025 | 10:13 AM
Raksha Bandhan 2025 : सणाचा गोडवा आणखीन वाढेल, खास दिवशी भावासाठी घरीच बनवा मऊसर 'मिल्क केक'

Raksha Bandhan 2025 : सणाचा गोडवा आणखीन वाढेल, खास दिवशी भावासाठी घरीच बनवा मऊसर 'मिल्क केक'

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मातील प्रमुख सण म्हणजे रक्षाबंधन! भावा-बहिणीच्या नात्याला सर्मर्पित हा सण देशभर मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी शनिवारी साजरा केला जाणार आहे. अशात या खास दिवसाला आणखीन खास बनवण्यासाठी आणि आपल्या भावाला खुश करण्यासाठी तुम्ही घरीच एक चवदार पदार्थ बनवू शकता. सणाच्या दिवशी घरात गोडाचे पदार्थ आवर्जून आणले जातात. यंदा सणाचा हा गोडवा वाढवण्यासाठी बाहेरुन पदार्थ न आणता घरीच ते तयार केले जाऊ शकतात. तुम्ही आपुलकीने आपल्या भावासाठी बनवलेला हा पदार्थ त्याला नक्कीच खुश करुन जाईल.

कोणत्याही भाजीसोबत खा याची चव तुम्हाला नाराज करणार नाही; जाणून घ्या Cheese Garlic Naan ची सोपी, चविष्ट रेसिपी!

तर आज आपण घरीच गोड आणि मऊ असा मिल्क केक कसा तयार करायचा याची एक सोपी आणि चवदार रेसिपी जाणून घेणार आहोत. मिल्क केक ही एक पारंपरिक भारतीय मिठाई आहे जी विशेषतः उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहे. ही मिठाई खवय्यांना दूधाचा गोड आणि समृद्ध स्वाद देते. ही मिठाई सण-उत्सवांमध्ये, लग्नसराईत आणि खास प्रसंगी हमखास केली जाते. दूध, साखर आणि साय याच्या योग्य प्रमाणातील वापरामुळे ही मिठाई खास रुचकर बनते. घरच्या घरी अगदी काही निवडक साधनांनी तुम्ही ही मिठाई तयार करू शकता.

साहित्य (Ingredients):

  • फुल फॅट दूध – 1.5 लिटर
  • साखर – 150 ग्रॅम (सुमारे ¾ कप)
  • लिंबाचा रस – 1 ते 2 चमचे (दूध फाडण्यासाठी)
  • साजूक तूप – 1 चमचा
  • वेलदोड्याची पूड – ½ चमचा (ऐच्छिक)
  • सुकामेवा – सजावटीसाठी (काजू, बदाम)

कृती

  • मिल्क केक तयार करण्यासाठी सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईत दूध गरम करत ठेवा. मध्यम आचेवर सतत ढवळत उकळा जेणेकरून दूध तळाला लागू नये.
  • जेव्हा दूध अर्ध्याहून अधिक आटेल, तेव्हा त्यात लिंबाचा रस थोडथोडका घालून दूध फाडा. हे पूर्णतः न फाडता अर्धवट फाडणे आवश्यक आहे.
  • दूध अर्धवट फाटल्यावर त्यात साखर घालून सतत ढवळा. साखर मिसळल्यावर मिश्रण घट्ट होऊ लागेल.
  • मिश्रण गुठळीत येऊ लागल्यावर त्यात 1 चमचा तूप आणि वेलदोड्याची पूड घालून नीट मिसळा.
  • मिश्रण गडद रंगाचे आणि चिकटसर झाल्यावर गॅस बंद करा.
  • एक तुप लावलेली प्लेट किंवा टिन घ्या आणि त्यात हे मिश्रण ओता. मिश्रण छान दाबून याचे एक बेस तयार करा.
  • आता हे मिश्रण थंड करा आणि थंड झाल्यावर चौकोनी किंवा डायमंड तुकडे कापा.
  • वरून सुकामेवा घालून सजवा आणि स्वादिष्ट मिल्क केक खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • दूध सतत ढवळणे अत्यंत आवश्यक आहे.
  • लिंबाचा रस ऐवजी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता.
  • ही पारंपरिक मिठाई घरी करून पाहा आणि आपल्या कुटुंबीयांसोबत गोड क्षणांची चव घ्या!

FAQs (संबंधित प्रश्न)

रक्षाबंधन कधी साजरा केला जातो?
हिंदू कॅलेंडरमध्ये श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

राखी बांधण्याचे महत्त्व काय?
भावाच्या कल्याणासाठी केलेल्या प्रार्थनेचे आणि भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देण्याचे प्रतीक आहे.

Web Title: Raksha bandhan 2025 on this special day make a soft milk cake at home for your brother recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Raksha Bandhan
  • sweet dish

संबंधित बातम्या

जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी
1

जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी

रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार
2

रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार

हिवाळ्याच्या थंडीत घरी बनवा चविष्ट ‘रताळ्याचे पराठे’, अभिनेत्री जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी
3

हिवाळ्याच्या थंडीत घरी बनवा चविष्ट ‘रताळ्याचे पराठे’, अभिनेत्री जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!
4

Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.