Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story : दोन तासाच्या प्रवासात ‘तो’ माझ्यासोबत होता अन् अचानक… रक्ताने माखलेला मृतदेह!

रावडे घाटातील काळोखात अँब्युलन्ससोबत प्रवास करणारा ‘तो’ शेवटी निघाला… मृतदेह! दोन तासांच्या प्रवासात रोहनसोबत बसलेला माणूस नंतर वॉलेटमध्येच… फोटो बनून दिसला!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 14, 2025 | 03:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • रात्रीच्या वेळी अंगावर काटा आणणारी कथ
  • रत्नागिरी घाटातील तो थरारक अनुभव
  • अपघात आणि अँब्युलन्स चालकाचा संवाद

कोकणातील रावडे घाट… कोकणातील लोकांना माहिताच आहे, दाट जंगलांनी वेढलेला, वळणावळणाचा आणि रात्रीच्या वेळी अंगावर काटा आणणारा हा घाट! आसपास माणसाचे गाव नाही, दवाखानाही नाही. काही आपत्कालीन झालं, तर रत्नागिरी शहरापर्यंत किमान तासभर प्रवास करावा लागतो. (Horror Story) 

Horror Story : ‘लिंबा’वर ठेवला पाय, शरीरात शिरली ‘ती’; दर्ग्यातही जायला …

त्या रात्री साडेबारा वाजता रोहन त्याची अँब्युलन्स घेऊन घाटातून येत होता. काळोख इतका दाट होता की फक्त अँब्युलन्सच्या दिव्यांनी दिसेल तेवढाच रस्ता त्याला कळत होता. अचानक धाड! त्याने ब्रेक ठोकले. समोर एक माणूस पूर्ण रक्तात माखलेला, जवळजवळ मृत अवस्थेत पडलेला! बाजूला त्याची दुचाकी चिरडून गेलेली. रोहन धावत गेला, तो अजून जिवंत होता. हलक्या श्वासात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. रोहनने वेळ न दवडता त्याला उचलून अँब्युलन्समध्ये ठेवले आणि वेगाने रत्नागिरीकडे गाडी वळवली. (Kokan)

घाट उतरून काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती अँब्युलन्सला हात दाखवत उभा. त्या परिसरात हॉस्पिटल नसल्यामुळे अशा वेळी लोक अँब्युलन्सलाच हात दाखवतात. रोहनने विचार न करता गाडी थांबवली. तो व्यक्ती गाडीत बसला आणि म्हणाला, “ट्रकने धडक दिली… डोक्याला लागलं… हातही नीट हालत नाही.” पण रोहनच्या लक्षात आलं — तो जिथे उभा होता, तिथे कुठेही दुचाकी नव्हती, स्किडचा खुणा नव्हत्या.

मात्र मागचा जखमी माणूस मरणाशी झुंजत असल्याने रोहनने त्या शंकेकडे दुर्लक्ष केले. तासभर झाला… मग दीड तास. पण रत्नागिरी अजूनही दिसत नव्हतं. दरम्यान अचानक तो व्यक्ती म्हणाला, “गाडी कडेला लावा.” रोहन घाईत असला तरी त्याने गाडी बाजूला घेतली. तो व्यक्ती शांतपणे खाली उतरला. रोहनने विचारलं, “कुठे जाताय?” पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि आजूबाजूला पाहिलं… आणि त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. ती तीच जागा होती, अगदी तीच! जिथे त्याने त्या व्यक्तीला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली होती.

Horror Story: मागच्या खिडकीत दिसली सावली… चढला ताप! उतरता उतरेना, गावचा रामबाण उपाय ठरला भुतांवर भारी 

रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. देवाचं नाम घेत त्याने वेगात गाडी पुढे हाकली. पुढचा प्रवास फक्त अर्ध्या तासात संपला आणि अँब्युलन्स हॉस्पिटलपर्यंत पोहोचली. पण आतला जखमी तोपर्यंत मृत झाला होता. कर्मचाऱ्यांनी मृतदेह नेला. रोहन गाडी बंद करणार इतक्यात त्याच्या नजरेस मागच्या बाजूला एक वॉलेट दिसलं. कुतूहलाने तो उघडतो… आत फोटो होता आणि फोटो पाहताच त्याच्या हातून वॉलेट खाली पडला. कारण त्यात फोटो होता त्या जखमी व्यक्तीचा! आणि हा तोच माणूस होता, जो रोहनसोबत रावडे घाटाच्या खाली लिफ्ट मागून बसला होता. हा तोच माणूस होता, जो अर्ध्या रस्त्यात अँब्युलन्समधून उतरून काहीही न उत्तर देता निघून गेला.

Web Title: Ratnagiri ambulance horror story marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • horror story
  • kokan

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast : पर्यटकांनो सावधान! आता किनारपट्टीवर हायअलर्ट जारी, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेत वाढ
1

Delhi Bomb Blast : पर्यटकांनो सावधान! आता किनारपट्टीवर हायअलर्ट जारी, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेत वाढ

मुंबईच्या जवळ राईड करण्यासाठी बेस्ट रूट! मिळेल स्वर्गानुभूती
2

मुंबईच्या जवळ राईड करण्यासाठी बेस्ट रूट! मिळेल स्वर्गानुभूती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.