पिगमेंटेशन घालवण्यासाठी उपाय
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्यरीत्या काळजी घेतली नाहीतर त्वचा खराब होण्याची शक्यता असते. खराब झालेली त्वचा पुन्हा एकदा सुधारवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. उन्हाळ्यासह पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या त्वचेला सूट होतील असे स्किन केअर प्रॉडकट वापरावे, ज्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. धावपळीच्या जीवनात कामाकडे लक्ष द्याल वेळ मिळत नाही. घाईगडबडीमध्ये महिलांचा संपूर्ण दिवस कामात निघून जातो. वयाच्या तिशी नंतर चेहऱ्यामध्ये अनेक बदल होऊ लागतात. चेहऱ्यावर वांग येणे, पिंपल्स येणे, मुरूम येणे, फोड येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यातील प्रामुख्याने सर्व महिलांमध्ये दिसून येणारी समस्या म्हणजे पिगमेंटेशन.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी ‘अशा’ प्रकारे करा लसणीचा वापर, काही दिवसांमध्ये दिसेल फरक
पिगमेंटेशन अनेकदा ओठांच्या बाजूने, कपाळावर, मानेवर आणि चेहऱ्याच्या इतर भागांवर दिसून येते. पिगमेंटेशन झाल्यानंतर ओठांभोवतीची त्वचा काळी दिसू लागते. त्यानंतर हळूहळू संपूर्ण चेहरा काळा पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पिगमेंटेशनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नेमके काय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
ओठांभोवती पिगमेंटेशन वाढू लागल्यानंतर सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पातळ कपड्याने त्वचा स्वच्छ पुसून घ्या. चेहरा धुवून स्वच्छ केल्यानंतर त्वचेला आठवणीने विटामिन सी सीरम लावा. ज्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. सीरम व्यवस्थित सुकल्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावून ठेवा. 10 मिनिटांनंतर चेहऱ्यावर सनस्क्रिन लावा. सनस्क्रिन लावल्यामुळे सूर्याच्या किरणानंपासून त्वचेचे नुकसान होणार नाही. या गोष्टी सकाळी उठल्यानंतर आठवणीने करा. यामुळे हळूहळू तुमच्या त्वचेवर आलेले पिगमेंटेशन कमी होईल.
हे देखील वाचा: केस धुतल्यानंतर सुद्धा केसांना वास येतो? मग नियमित करा ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर
बाहेरून जाऊन आल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर ट्रानेक्झानिक ॲसिड, अल्फा अर्बुटीन, कॉजिक ॲसिड इत्यादी घटक असलेले कोणतेही सीरम लावा. त्यानंतर चेहऱ्यावरील डार्क सर्कल घालवण्यासाठी अंडरआय क्रिम लावा. 5 मिनिट थांबून नंतर स्किन ब्राईटनिंग नाईट क्रिम लावा. हा उपाय नियमित 15 दिवस केल्यामुळे तुमच्या ओठांवरील पिगमेंटेशन कमी होईल.