एकादशी तिथी महिन्यातून दोनदा येते. एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्षात येते. वैशाख महिन्याच्या शुक्क्ष पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी नावाने ओळखले जाते.
हिंदू पंचांगानुसार, एकादशी तिथी महिन्यातून दोनदा येते. एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्षात येते. वैशाख महिन्याच्या शुक्क्ष पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी नावाने ओळखले जाते. या शुभ दिवशी विष्णूच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. ही तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. यावर्षी मोहिनी एकादशीचे व्रत १९ मे रोजी केले जाणार आहे. या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते.
मोहिनी एकादशी शुभ मुहूर्त
एकादशी तिथी प्रारंभ १८ मे रोजी सकाळी ११.२२ वाजता
एकादशी तिथी समाप्त १९ मे रोजी दुपारी १.५० वाजता
पारणा मुहूर्त 29 मे रोजी सकाळी ५.४४ वाजल्यापासून ८.२४ वाजेपर्यंत
पारणतिथीला द्वादशी संपण्याची वेळ दुपारी ३.५८
मोहिनी एकादशीचे महत्त्व
या शुभ दिवशी विधीनुसार पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
मोहिनी एकादशी नाव कसे पडले?
समुद्रमंथन झाल्यावर अमृत मिळविण्यासाठी देव-दानवांमध्ये स्पर्धा लागली. दैत्य शक्तीच्या बाबतीत देवांपेक्षा बलवान होते. प्रयत्न करूनही देवांना दानवांचा पराभव करता आला नाही. सर्व देवतांच्या विनंतीवरून, भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले, राक्षसांना आपल्या मायाजालात अडकवले आणि सर्व अमृत देवतांना प्यायला दिले. यामुळे सर्व देवांना अमरत्व प्राप्त झाले. त्यामुळेच या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात.
मोहिनी एकादशीचे व्रत विधी
या शुभ दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा. आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर घरातल्या मंदिराची साफसफाई झाल्यानंतर तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करा. यानंतर भगवान विष्णूंना स्वच्छ वस्त्र परिधान करावे. भगवान विष्णूची आरती करून अन्नदान करावे. भगवान विष्णूच्या नैवेद्यात तुळशीचा समावेश करा. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू तुळशीशिवाय अन्न स्वीकारत नाहीत. देवाला केवळ पुण्यपूर्ण वस्तूच अर्पण करता येतात हे लक्षात ठेवा.