
आता भाड्याने मिळत आहेत बॉयफ्रेंड, किती आहे किंमत
एक काळ असा होता की लोकांचे जीवन अगदी नाकासमोर सरळ रेषेवर चालायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर लोक नोकरी आणि मग लग्न करून कुटुंब वाढवत असत. मात्र, अर्थव्यवस्था आणि इतर गोष्टी बदलल्यानंतर हा पॅटर्नही बदलला. लोक आता त्यांच्या करिअर आणि इतर गोष्टींमध्ये इतके व्यस्त झाले आहेत की त्यांना लग्न आणि डेटिंगचा विचार करायलाही वेळ मिळत नाही. अशा स्थितीत त्यांना खरा जोडीदार न मिळाल्यास ते भाड्याने घेतलेल्या जोडीदारासोबत मॅनेज करतात अशी सद्यस्थिती उद्भवली आहे. हो तुम्ही योग्यच वाचताय.
जगातील अनेक देशांमध्ये, तरुणांना लग्नासाठी वेळ नसतो, म्हणून ते भाड्याने भागीदार घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करतात. कौटुंबिक दबावाखाली मुली आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना खूश करण्यासाठी थोडे पैसे खर्च करतात आणि सुंदर आणि परफेक्ट प्रियकराला सोबत घेऊन जातात. हे बॉयफ्रेंड भाड्याने घेतले जातात, जे कुटुंबाला इंप्रेस करतात. कुठल्या देशात मिळतात असे भाड्याचे बॉयफ्रेंड आणि काय आहे कारण जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
भाड्याने मिळतात, ‘Perfect Boyfriend’
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, व्हिएतनाममधील लोकांकडे लग्नासाठी वेळ नाही आणि ते भाड्याने जोडीदार घेत आहेत. विशेष म्हणजे या बाबतीत मुलांपेक्षा मुलींचा पुढाकार अधिक असल्याचे दिसून आले आहे. पालकांच्या दबावामुळे आणि करिअर घडवण्याची आवड यामुळे विएतनाममधील मुली रेंटल बॉयफ्रेंडचा पर्याय निवडत आहे. भाड्याने मिळणाऱ्या बॉयफ्रेंडमध्ये कुटुंबांना हवे असलेले सर्व गुण असतात.
पुरूष नात्यात का देतात धोका? फक्त लैंगिक संबंधच नाही तर ही आहेत 5 धक्कादायक कारणं
सर्वगुणसंपन्न भाड्याचे बॉयफ्रेंड
हे भाड्याचे बॉयफ्रेंड स्वयंपाक करण्यापासून वस्तू बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत तज्ज्ञ आहेत. दिसायलादेखील हे इतके देखणे आहेत की अगदी मुलीच्या मैत्रिणीलादेखील त्यांना पाहून हेवा वाटू शकतो आणि त्याच्या परिपूर्ण जावयाला पाहून पालकांना अभिमान वाटतो. मात्र हा जावई कायमस्वरूपी नाही तर भाड्याने घेतलेला आहे आणि सध्या याची सर्व्हिसही विएतनाममध्ये पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
किती पैसे मोजावे लागतात?
अशा प्रकारचा बॉयफ्रेंड मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त पैसे खर्च करावे लागतील. जर तुम्हाला डेटवर जायचे असेल तर तुम्हाला 10-20 डॉलर्स म्हणजेच 800-1700 रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हाला त्यांची तुमच्या कुटुंबाशी ओळख करून द्यायची असेल, तर खर्च थोडा वाढतो आणि तुम्हाला सुमारे 1 दशलक्ष व्हिएतनामी डोंग म्हणजेच 3400 रुपये खर्च करावे लागतील. 1 डोंग म्हणजे भारतीय 0.0033 रूपये होतात. त्यामुळे भारताच्या रूपयांनुसार याची किंमत अगदीच स्वस्त आहे.
Chanakya Niti: नात्यात या 7 वेळी बसा गप्प, तरचं राहील टिकून
केवळ व्यावसायिक संबंध
अशी बॉयफ्रेंड बनण्याची ऑफर देणाऱ्या मुलांना या कामासाठी स्वतःला तंदुरुस्त, सुंदर आणि कुशल बनवावे लागते, कारण त्यांची मागणी जास्त प्रमाणात असते. ज्या मुलीसोबत त्यांना कुटुंबाला भेटायला जायचे आहे त्यासाठी ते घरी जाण्याच्या एक आठवडा आधी मुलीला ते भेटू लागतात आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या प्रकारच्या सेवेच्या करारामध्ये वा या नात्यामध्ये शारीरिक किंवा भावनिक कोणताही संबंध ठेवला जाणार नाही, हे निव्वळ व्यावसायिक संबंध आहे हेदेखील स्पष्ट केले जाते.