शब्दांमध्ये मोठी ताकद असते आणि म्हणूनच त्याची तुलना तलवारीशी केली जाते. शब्द कोणाचेही ह्रदय पटकन तोडू शकतात आणि आपल्या हळुवारपणाने कोणाच्या तरी हृदयात घर करू शकतात. त्याचप्रमाणे मौन हे देखील एक शक्तिशाली साधन आहे. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही ठिकाणी शब्द न वापरता मौन बाळगावे, विशेषतः नातं जपताना हे अत्यंत गरजेचे आहे. जाणून घ्या कोणते 7 प्रसंग आहेत जिथे एखाद्या व्यक्तीने शांत राहावे, असे करणे प्रत्येकासाठी शहाणपणाचे ठरेल. (फोटो सौजन्य - iStock)
चाणक्य नीती जीवनातील अनेक महत्त्वाची रहस्ये सांगते. कोणत्या 7 ठिकाणी बोलल्याने तुमचे काम बिघडू शकते जिथे मौन बाळगायची गरज आहे हे जाणून घ्या
आपल्याला एखाद्याकडून गोष्ट जाणून घ्यायची असेल तर सहसा गप्प राहावं, तुम्ही का गप्प आहात यामुळे समोरची व्यक्ती भराभर बोलून मोकळी होते
जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि रागाने बोलत असेल तर अशा स्थितीतही शांत रहा. या ठिकाणी बोलणे अयोग्य ठरेल
जेव्हा एखादी व्यक्ती दुःखात असते किंवा तोटा होत असते तेव्हा काहीही बोलण्यापेक्षा त्याच्यासोबत राहणे चांगले असते. अशा महत्त्वाच्या क्षणी काहीतरी बोलणे असंवेदनशील वाटू शकते
ऑफिसमध्ये असो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात इतरांबद्दल गॉसिप करणाऱ्या लोकांमध्ये न राहणे आणि अशा प्रकारचे संभाषण टाळणे चांगले ठरते
जर ऑफिसमध्ये मीटिंग होत असेल आणि तुम्ही त्यासाठी आधीच तयारी केली नसेल, तर गप्प राहणेच योग्य. फक्त ऐका आणि शिका, ते शहाणपणाचे ठरेल
शांत राहून ऐकणे हे त्यांचे विचार आणि भावना तुमच्याशी शेअर करण्यासाठी सुरक्षित जागा तयार करू शकतात. यामुळे समोरच्या व्यक्तीला दिलासा मिळेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल
काहीतरी वाईट बोलण्यापेक्षा गप्प राहणे चांगले असते, ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. शांत राहिल्याने तुम्हाला तुमचे शब्द आणि त्यांच्या प्रभावाबद्दल विचार करायला वेळ मिळतो