नात्यातील फसवणूक का होते
नातेसंबंधातील प्रेम ही भावना विश्वास आणि प्रामाणिकपणाच्या पायावर संपूर्ण आयुष्यासाठी पुरत असते, पण जेव्हा हा विश्वास तुटतो तेव्हा अनेक प्रश्नही निर्माण होतात. विशेषत: जेव्हा पुरुष नात्यामध्ये स्त्री ला फसवतात होते तेव्हा प्रश्न आणखी मोठा होतो की ते असे का करतात? अर्थात असं नाही की कोणती स्त्री पुरुषाला फसवत नाही.
मात्र आपला समाज हा पुरूषप्रधान आहे आणि समाजात एक समज आहे की पुरुषांचा स्वभावच असा आहे की, ते अधिक फसवणूक करतात, परंतु या मागे अनेक खोल आणि धक्कादायक कारणे आहेत, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. फसवणुकीची सुरूवात मात्र अनेकदा पुरूष करतात हे अनेक अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे (फोटो सौजन्य – iStock)
नक्की का करतात फसवणूक
पुरूषांकडून फसवणूक का केली जाते
काहीवेळा हे केवळ आकर्षण किंवा कोणत्याही नात्याची नवीन सुरुवात करण्याची इच्छा नसते, तर त्यामागे काही मानसिक आणि भावनिक कारणे दडलेली असतात. हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. समुपदेशक अजित भिडे यांनी पुरूष का फसवणूक करतात याची 5 कारणे दिली आहेत आणि हे वाचून तुम्हालाही यावर विचार नक्कीच करावा वाटेल.
हेदेखील वाचा – पती – पत्नीच्या नात्यात ‘वो’ ठरतेय नोकरी, असे सांभाळा नातं दुरावा करा दूर
भावनिक कमतरता
भावना एकाजवळ व्यक्त करता येत नसल्यास
जेव्हा अनेक पुरुषांना त्यांच्या वैवाहिक जीवनात किंवा प्रेमसंबंधांमध्ये भावनिक समाधान मिळत नाही, तेव्हा ते बाहेरील कोणत्यातरी व्यक्तीशी भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न करतात. याचे कारण असे असू शकते की ते त्यांच्या जोडीदाराशी भावनिक संबंध अनुभवू शकत नाहीत, मात्र आयुष्यात भावना व्यक्त करण्यासाठी ते दुसऱ्या कोणावरही पटकन अवलंबून राहू शकतात
खोटा आत्मविश्वास वाढविणे
काही पुरुषांसाठी, फसवणूक हा त्यांचा खोटा स्वाभिमान वाढवण्याचा प्रयत्न असू शकतो. जेव्हा त्यांना आपण यशस्वी आहोत वा आकर्षक आहोत किंवा सक्षम आहोत असे वाटत नाही, तेव्हा ते आपल्या जोडीदाराला फसवून दुसऱ्याशी संबंध प्रस्थापित करून त्यांचा ‘मर्दपणा’ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
उत्साहाची कमतरता
जोडीदारामध्ये उत्साह नसणे
पुरुष अनेकदा फसवणूक करतात कारण त्यांना त्यांच्या चालू अर्थात सध्याच्या नातेसंबंधात उत्साहाची कमतरता जाणवत असते. एक नवीन नाते किंवा नवीन व्यक्ती त्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह आणते, जी त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात जगण्याला अधिक बळ देते असं वाटतं. त्यासाठी ते जोडीदाराला फसवू शकते.
केवळ संधी
पुष्कळ वेळा पुरुष ही आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात कारण त्यांनी तशी दुसरी केवळ संधी मिळालेली असते. फसवणूक केली आहे किंवा पकडले जाण्याची भीती त्यांना जाणवत नाही अशी संधी मिळाल्यास ते त्याचा फायदा घेतात आणि त्यांना त्याबाबत कोणतीही लाज वा शरम बाळगण्याची इच्छाही नसते. कारण तो त्यांचा स्वभावच नसतो
हेदेखील वाचा – Chanakya Niti: नात्यात या 7 वेळी बसा गप्प, तरचं राहील टिकून
विविध लैंगिक संबंध
एकाच स्त्री मध्ये समाधानी नसणे
अनेक पुरुषांना एकाच जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा कंटाळा येतो आणि त्यांना नवीन लैंगिक विविधता हवी असते. हे शारीरिक आकर्षणावर आधारित आहे, ज्यामुळे ते त्यांच्या चालू असलेल्या नातेसंबंधांना महत्त्व न देता इतर कोणाशी तरी बाहेरख्याली संबंध ठेवतात.
फसवणूक करण्यामागे ही आश्चर्यकारक कारणे असू शकतात, परंतु याचा अर्थ ते योग्य आहे असे अजिबात नाही. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि संवाद महत्त्वाचा आहे. जर एखादी व्यक्ती या भावनांमधून जात असेल तर त्याने फसवणूक करण्याऐवजी आपल्या जोडीदाराशी बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.