Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, लहान वाटणाऱ्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. जाणून घ्या फुफ्फुस खराब झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 25, 2025 | 12:24 PM
फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

कायम निरोगी राहण्यासाठी शरीरात सर्वच अवयव निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण एक अवयव बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. शरीरात प्रत्येक लहान मोठा अवयव वेगवेगळ्या क्रिया करतो. त्यामुळे शरीराची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे फुफ्फुस. वय वाढल्यानंतर फुफ्फुसांची क्षमता काहीशी कमी होऊन जाते. त्यामुळे फुफ्फुसांसंबधित बऱ्याच समस्या उद्भवतात. याशिवाय फुफ्फुस खराब होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे प्रदूषण. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)

STI Problem: 40% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त, लाजेमुळे उपचारास विलंब; तज्ज्ञांचा खुलासा

भारतात वाढलेल्या वायू प्रदूषणाचा परिणाम फुफ्फुसांवर लगेच दिसून येत आहे. दूषित हवेच्या सानिध्यांत जास्त वेळ राहिल्यास फुफ्फुसांना हानी पोहचण्याची शक्यता असते. फुफ्फुस खराब झाल्यानंतर किंवा निकामी झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात ही लक्षणे दिसताच दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

फुफ्फुस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

श्वास घेताना अडचण निर्माण होणे:

फुफ्फुसांची क्षमता कमी झाल्यानंतर श्वास घेताना अनेक अडचणी निर्माण होतात. याशिवाय काहीवेळा श्वास घेताना खूप जास्त त्रास होतो. याशिवाय पायऱ्या चढल्यानंतर किंवा उतरल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर, ही समस्या सामान्य नसून वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. फुप्फुसांची इलास्टिसीटी कमी किंवा जास्त वेळी प्रदूषणात राहिल्यामुळे फुफ्फुस कमकुवत होऊन जातात.

सतत खोकला येणे:

कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला जर वारंवार खोकला येत असेल तर फुफ्फुस खराब झाल्याचे संकेत आहेत. फुप्फुसामध्ये जळजळ किंवा सूज आल्यानंतर शरीराला हानी पोहचते. याशिवाय वारंवार कफ येणे किंवा श्वास घेताना अडचण निर्माण झाल्यास फुफ्फुस कमकुवत झाल्याचे संकेत आहेत. ही समस्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.

छातीमध्ये वेदना होणे:

बऱ्याचदा अपचन झाल्यानंतर सुद्धा छातीमध्ये वेदना होतात. पण वारंवार छातीमध्ये वेदना होत असतील तर फुप्फुसामध्ये सूज किंवा कॉन्स्ट्रिक्शन झाल्याचे संकेत असू शकता. याशिवाय काहीवेळा कोणत्याही कारणाशिवाय अस्वथ वाटू लागते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करावेत.

उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ भयानक बदल, शरीर ठेवा हायड्रेट

FAQs (संबंधित प्रश्न)

फुफ्फुसाच्या नुकसानाची सामान्य लक्षणे:

श्वास लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, सततचा खोकला, विशेषतः श्लेष्मा निर्माण करणारा, घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीत जडपणा किंवा अस्वस्थता जाणवणे, वारंवार श्वसनमार्गाचे संक्रमण होणे.

फुफ्फुसाच्या नुकसानाची कारणे:

न्यूमोनिया किंवा इतर संसर्गामुळे फुफ्फुसांना नुकसान होऊ शकते. दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD), फुफ्फुसाचा कर्करोग, पल्मोनरी फायब्रोसिस इत्यादी आजारांमुळे फुफ्फुसांचे नुकसान होते.

नुकसानाचे निदान आणि उपचार:

डॉक्टर छातीचा एक्स-रे, रक्त चाचण्या, पल्स ऑक्सिमेट्री (रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी) आणि इतर वैद्यकीय चाचण्यांद्वारे नुकसानाचे कारण आणि तीव्रता ठरवतात.

Web Title: Serious symptoms of weak lungs dont ignore these early warning signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • health care news
  • healthy lungs
  • Lung health

संबंधित बातम्या

हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक,  आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराने आहेत त्रस्त
1

हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराने आहेत त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.