शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींना पाठवा 'या' खास शुभेच्छा
जगभरातील सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. दरवर्षी १९ फेब्रुवारीला मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरा केली जाते. राक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाचे ज्वलंत उदाहरणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवजयंतीच्या दिवशी राज्यातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय पोवाडा, पारंपरिक वेशभूषा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला मुघलांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी मराठी साम्राज्याचा पाया रचला. इतिहासामध्ये पराक्रमी राजा म्हणून म्हणून शिवाजी महाराजांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी कधीच कोणत्याही जाती धर्मांमध्ये भेद केला नाही, त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा अशी पदवी देण्यात आली. आज आम्ही तुम्हाला शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींना देण्यासाठी काही खास संदेश सांगणार आहोत. हे संदेश वाचून तुम्हाला सुद्धा नक्कीच प्रेरणा मिळेल.(फोटो सौजन्य – iStock)
“रणांगण दणाणलं, सिंह गर्जला,
मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं,
पराक्रमाची गाथा लिहून गेला जो,
तो एकच -छत्रपती शिवराय!”
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
“सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे,
स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे,
छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!”
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
एक मराठा लाख मराठा
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती,
शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा,
शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जगणारे ते मावळे होते
जगणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन
जनतेवरुन मायेने हात फिरवणारा
राजा छत्रपती होता
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग…
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास
रयतेचे सुख ही एकच मनी होती आस
मुघलांनाही कधी न कळला
त्याचा गनिमी कावा
असा वाघिणीचा होता तो छावा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
निधड्या छातीचा, दणकट कणांचा,
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा,
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
चारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा,
एकच होता असा राजा,
नाव त्याचं घेऊ किती
म्हणतात त्याला छत्रपती!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
chattrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? जाणून घ्या त्यांनी नावे
शूरता हा माझा आत्मा आहे,
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे…
जय शिवराय!