महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परकीय आक्रमणांपासून रयतेचं संरक्षण व्हावं यासाठी राजांनी गिरीदुर्गांप्रमाणेच सागरी तटबंदीसुद्धा भक्कम केली होती. त्यामुळे डच,मुघल, ब्रिटीश सैन्य अफाट असूनही स्वराज्यावर चाल करुन येणं त्य़ांच्यासाठी अवघड होतं. यातील एका जलदुर्गाचा इतिहास आज जाणून घेऊयात.
chhatrapati shivaji maharaj jayanti 2025 :'या' किल्ल्यावर आहे शिवरायांच्या पावलांचे ठसे; काय आहे याचा इतिहास ?
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पावन झालेली महाराष्ट्राची भूमी आणि सह्याद्री राजांच्या पराक्रमाची कायमच साक्ष देत आले आहेत. स्वराज्यात महाराजांनी 300 पेक्षा जास्त किल्ल्यांची उभारणी केली.
स्वराज्यातील सर्वच किल्लांची उभारणी ही हिरोजी इंदुलकर यांनी केली. स्वराज्यातील इतर निष्ठावंत मावळ्यांपैकीच एक हिरोजी इंदुलकर होते.
हिरोजी इंदुलकर आणि महाराज याच्यांतील विश्वास अतूट होता. म्हणूनच मालवणच्या कुरटे बेटावर किल्ला उभारणीची आज्ञा महाराजांनी इंदुलकरांना दिली होती.
सलग तीन वर्षानंतर किल्ला बांधणीचं काम पुर्ण झालं. त्यावेळी इंदुलकरांनी केलेल्या कामगिरीसाठी महाराजांनी त्याचं कौतुक केलं. तेव्हा महाराजांनी तुम्हाला काय हवं आहे असं इंदुलकरांना विचारलं. त्यावर इंदुलकरांनी आदरपुर्वक इच्छा व्यक्त केली.
जस्त आणि चुनखडीचं मिश्रण असलेलं तबक इंदुलकरांनी मागवलं. त्यानंतर इंदुलकर महाराजांना म्हणाले की, तुमच्या चरणांचा स्पर्श व्हावा अशी प्रत्येक मावळ्याची इच्छा आहे.
मालवणच्या या किल्ल्यावर शिवरायांचं अस्तित्व रहावं यासाठी इुंदलकरांनी शिवरायांच्या पायांचे ठसे घेतले होते. आजही महाजांच्या पावलांचे जसेच्या तसे ठसे सिंधुदुर्ग किल्ल्यावर दिसतात.