Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर जल्लोषाचे वातावरण असते आणि मुंबईजवळील किल्ल्यांवर विशेष उत्साह पाहायला मिळतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 17, 2026 | 05:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव म्हणजे मराठी माणसाचे हृदयच! देवासमान असणारी ही प्रतिमा, प्रत्येक मराठी माणसाचं हृदय आहे. शिवजयंती हा महाराष्ट्राच्या मातीतला सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण! राज्यभरात जल्लोषाचे वातावरण असणार आहे.जर तुम्हाला या दिवशी मुंबईच्या जवळील काही किल्ल्यांना भेट देऊन, १९ फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती साजरी करायची आहे, तर या किल्ल्यांना नक्की भेट द्या.

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

माहुली किल्ला

ठाणे जिल्ह्यातील हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माहुली निसर्गसौंदर्य आणि इतिहास यांचा सुंदर संगम दाखवतो.

विसापूर

लोणावळ्याजवळील हा भव्य किल्ला पावसाळी ट्रेकसाठी प्रसिद्ध असला तरी शिवजयंतीलाही येथे मोठी गर्दी होते. विशाल तटबंदी आणि तोफा पाहण्यासारख्या आहेत.

खांदेरी-उंदेरी

अरबी समुद्रातील हे जलदुर्ग शिवकालीन सागरी सामर्थ्याची साक्ष देतात. बोटीने जाऊन येथे शिवजयंती साजरी करण्याचा अनुभव वेगळाच असतो.

कुलाबा

अलिबाग किनाऱ्यालगत असलेला हा सागरी किल्ला भरती-ओहोटीच्या वेळी पायीही गाठता येतो. येथे शिवप्रतिमेसमोर अभिवादन करताना अभिमानाची भावना दाटून येते.

रायगड

शिवरायांची राजधानी! इथले राजसभागृह, मेघडंबरी आणि समाधीस्थळ प्रत्येक शिवभक्तासाठी पवित्र आहे. शिवजयंतीला येथे भव्य कार्यक्रम होतात.

शिवनेरी

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. शिवजयंतीला येथे विशेष सोहळे आणि ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

सिंहगड

तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला देशभक्तीची जाणीव करून देतो. पहाटेचा सूर्य आणि ‘गड आला पण सिंह गेला’ची आठवण मन भारावून टाकते.

सुवर्णदुर्ग

कोकण किनाऱ्यावरील हा भव्य जलदुर्ग सागरी संरक्षण व्यवस्थेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सुवर्णदुर्ग दापोलीतील हर्णे गावाजवळ स्थित आहे.

“पुरूषांना फक्त व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

मुरुड जंजिरा

समुद्रात अभेद्य उभा असलेला हा किल्ला स्थापत्यकलेचा अनोखा नमुना आहे. इतिहासप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव देणारे ठिकाण.

या सर्व किल्ल्यांवर शिवजयंतीचा उत्साह असतो. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला आणि छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरी या दोन किल्ल्यांवर थाटात शिवजयंती साजरी केली जाते. मुंबईच्या जवळील या किल्ल्यांना शिवजयंतीच्या मुहूर्तावर नक्की भेट द्या.

Web Title: Shivjayanti 2026 visit at these forts near to mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.