
Shravan 2026 : श्रावणात महादेवांना अर्पण करा ही ५ पवित्र फुले; सुख-समृद्धीसोबत सकारात्मक ऊर्जाही मिळेल
Gardening Tips : मोगऱ्याचं झाड फुलांनी बहरवायचंय? घरच्या घरी कचऱ्यापासून तयार करा नैसर्गिक द्रावण
बेलपत्र
आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, महादेवाच्या पूजेत बेलपत्राला फार महत्त्व आहे. यातील तीन पाने शिवाच्या नेत्रांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. जर तुमच्या घरजवळ मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही बेलाचे झाड लावू शकता. याला मोठ्या कुंडीत देखील उगवले जाऊ शकते. हे झाड हळूहळू मोठे होते ज्यामुळे पर्याप्त जागेची याला गरज असते.
शमीचे झाड
शमीचे झाड हे धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही दृष्ट्या फार महत्त्वाचे मानले जाते. शिवपूजेत याची पाने देवाला अर्पण केली जातात. हे झाड सूर्यप्रकाशात चांगले वाढते यामुळेच घरात जर हे झाड लावत असाल तर सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी त्याला ठेवा. एका मान्यतेनुसार, शमीचे झाड घरी लावल्याने घरात सकारात्मक उर्जा वाढते.
कनेरचे रोप
पिवळ्या आणि सफेद फुलांनी बहरणारे कनेरचे फुल शिवपूजेत अर्पण केले जाते. हे झाड घराची शोभा वाढवण्यास मदत करते. घरात कनेरचे झाड लावणे शुभ संकेत मानले जाते. तथापि, फांद्यांमध्ये पांढरा, दुधाळ रस येतो तो विषारी मानला जातो. यामुळेच लहान मुलांना किंवा प्राणी-पक्ष्यांना या झाडाजवळ पाठवू नये, या झाडाला हात लावल्यानंतर आपले हात स्वच्छ करायला विसरु नका.
चंपाचे झाड
चंपाचे फुल आपली सुंदरता आणि सुंगधासाठी ओळखले जाते. श्रावणात भगवान शिवाला चंपाचे फूल अर्पण करण्याची प्रथा आहे. हे फूल सूर्यप्रकाशात चांगले वाढते. तुम्ही बाल्कनीत किंवा घराच्या अंगणात याचे झाड लावू शकता. यामुळे घराच्या साैंदर्यात वाढ होईल आणि पूजेत फुलांचा वापरही होईल.
मोगऱ्याचे फूल
मोगऱ्याचा मनमोहक सुगंध अनेकांना याकडे आकर्षित करतो. अनेक भारतीय घरांमध्ये सणासुदीला किंवी पूजेत मोगऱ्याच्या फुलांचा वापर केला जातो. उन्हाळ्यात किंवा सूर्यप्रकाशात या झाडाची वाढ चांगली होते. नियमित पाणी आणि हलकी छाटणी केल्यास दिर्घकाळापर्यंत हे झाड घरात उगवले जाऊ शकते.