(फोटो सौजन्य: Pinterest)
मसुरी ट्रिपमध्ये ‘झरीपानी कॅसल’ला नक्की भेट द्या; यालाच म्हणतात खरं ‘मुसाफिर कॅफे’
कांद्याच्या सालींचा वापर
अनेकांना हे ठाऊक नाही पण कुंडीत कांद्याच्या साली टाकून झाडांची वाढ केली जाऊ शकते. स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून म्हणजेच कांद्याच्या सालींपासून तयार केलेले द्रव खत झाडाला आवश्यक पोटॅशियम आणि नायट्रोजन पुरवते. हे द्रावण झाडांमध्ये टाकल्याने अवघ्या काही दिवसांमध्येच झाडांवर कळ्या येण्यास सुरुवात होते.
वेळोवेळी छाटणी करा
झाडाची योग्य रितीने वाढ होण्यासाठी पानांची वेळोवेळी छाटणी होणे फार गरजेचे असते. याला प्रूनिंग असं म्हटलं जातं. मोगऱ्याच्या झाडाची छाटणी केल्याने झाड वेगाने आणि योग्य रितीने वाढण्यास मदत होते. यामुळे नव्या फांद्या, फुले आणि कळ्या येण्यास मदत होते. झाडाची वाढ जर अस्थिर होत असेल तर त्याची छाटणी करणे अनिवार्य ठरते.
सूर्यप्रकाश आणि शेणखत
कोणत्याही झाडाची वाढ होण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशात ठेवणे गरजेचे असते. मोगऱ्याच्या झाडाला दिवसभर सूर्यप्रकाशात ठेवा. तसेच दर १५-२० दिवसांनी यात गांडूळ खत किंवा शेणखत घाला, यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते.
कांद्याच्या सालींचा वापर
मोगऱ्याच्या झाडावर असंख्य कळ्या हव्या असतील तर यात लिक्विड फर्टिलाइजरचा वापर करणे महत्त्वाचे ठरु शकते. हे लिक्विड फर्टिलाइजर तुम्ही कांद्याच्या सुक्या सालींपासून तयार करु शकता. कांद्याच्या सालींमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, ही सर्व पोषक तत्वे वनस्पतीच्या फुलोऱ्यासाठी आवश्यक आहेत.
Gardening Tips : कुंडीत लिंबाचं रोप लावलंय? ही फ्री ट्रिक वापरा, लिंबांनी बहरून जाईल झाड
कांद्याच्या सालींपासून खत कसे तयार करायचे?
हे खत तयार करण्यासाठी स्वयंपाकघरातून कांद्याच्या सुक्या साली गोळ्या करा. या सालींना काही वाडग्यात जमा करुन साली बुडतील इतकं पाणी त्यात घाला. साधारण आठवडाभर या साली पाण्यात भिजवून ठेवा. पाण्याचा रंग यानंतर काहीसा गुलाबी झाल्याचा तुम्हाला दिसेल. ७ दिवसांनंतर यापासून लिक्विड फर्टिलाइजर तयार होते. यानंतर हे पाणी गाळून घ्या. लक्षात घ्या हे पाणी तुम्हाला डायरेक्ट कुंडीत घालायचे नाही आहे. अर्धा ग्लास लिक्विड फर्टिलाइजर १ लीटर पाण्यात मिक्स करा आणि मग हे पाणी कुंडीत घाला. महिनातून १-२ वेळा तुम्ही हे द्रावण कुंडीत घालू शकता. याच्या मदतीने झाडाची चांगली वाढ होईल आणि कुंडी मोगऱ्याची फुलांनी भरुन जाईल.






