Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधा, सोपा पण चवीला मजेदार असा स्ट्रीट स्टाईल ‘अंडा बर्गर’, हलक्या भुकेला शमवण्यासाठी परफेक्ट पर्याय

Desi Style Egg Burger Recipe : बर्गर ही एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या पाश्चात्य पदार्थाला देसी टच देऊन आपण चविष्ट आणि झटपट असा अंडा बर्गर तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 26, 2025 | 08:15 PM
साधा, सोपा पण चवीला मजेदार असा स्ट्रीट स्टाईल 'अंडा बर्गर', हलक्या भुकेला शमवण्यासाठी परफेक्ट पर्याय

साधा, सोपा पण चवीला मजेदार असा स्ट्रीट स्टाईल 'अंडा बर्गर', हलक्या भुकेला शमवण्यासाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • एग बर्गर हा एक देसी पदार्थ आहे जो तुम्हाला भारताच्या रस्त्यावर हमखास दिसून येईल.
  • मुख्य म्हणजे चवीला हा पदार्थ जितका स्वादिष्ट लागतो तितकाच लवकर तो बनून तयार होतो.
  • अंड्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात ज्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी अंडा बर्गर एक उत्तम पर्याय ठरेल.
आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट, चविष्ट आणि पोटभर जेवण हवे असेल तर इंडियन स्टाईल एग बर्गर हा एक उत्तम पर्याय आहे. परदेशी बर्गरची कल्पना भारतीय मसाल्यांच्या चवीशी एकत्र आली की तयार होतो हा खास बर्गर. अंडी ही प्रोटीनने भरपूर असल्यामुळे हा बर्गर केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा बर्गर आवडतो.

31 डिसेंबर स्पेशल घरी बनवा मसालेदार अन् शाही चवीचे ‘शामी कबाब’, लगेच नोट करा रेसिपी

भारतीय पद्धतीत बनवलेल्या एग बर्गरमध्ये हिरवी मिरची, कांदा, गरम मसाला, लाल तिखट आणि बटरची खास चव असते. रस्त्यावरील स्टॉलवर मिळणाऱ्या एग बर्गरची चव घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. सकाळचा नाश्ता, दुपारचा हलका आहार किंवा संध्याकाळचा स्नॅक म्हणून हा बर्गर एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया इंडियन स्टाईल एग बर्गरची सोपी रेसिपी.

 साहित्य:

  • अंडी – 4
  • बर्गर बन – 2 (मधून कापलेले)
  • कांदा – 1 बारीक चिरलेला
  • हिरवी मिरची – 1 बारीक चिरलेली
  • टोमॅटो – 1 गोल चिरलेला
  • बटर – 2 टेबलस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – थोडी चिरलेली
  • मेयोनीज
  • हिरवी चटणी – आवडीनुसार
हिवाळ्यात आवर्जून बनवा पंजाबचा फेमस पदार्थ ‘सरसो दा साग’, चवीसह शरीरालाही मिळवून देईल अनेक फायदे

 कृती:

  • अंडा बर्गर तयार करण्यासाठी सर्वप्रथम  एका भांड्यात अंडी फोडून घ्या. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चिरलेली कोथिंबीर घालून नीट फेटा.
  • तव्यावर थोडे बटर गरम करा आणि त्यात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्या.
  • आता फेटलेले अंड्याचे मिश्रण तव्यावर ओता आणि मध्यम आचेवर ऑम्लेट तयार करा.
  • ऑम्लेट शिजल्यावर ते बर्गर बनच्या आकारात कापून घ्या.
  • दुसऱ्या तव्यावर बर्गर बन थोड्या बटरवर हलकेसे भाजून घ्या.
  • बर्गर बनच्या एका भागावर मेयोनीज, हिरवी चटणी लावा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही सॉस यावर लावू शकता.
  • आता तयार ऑम्लेट, टोमॅटो स्लाइस आणि थोडा कांदा ठेवा आणि वर बन ठेवून हलके दाबा.
  • गरमागरम इंडियन स्टाईल एग बर्गर तयार आहे.
  • चहा किंवा कॉफीसोबत तुम्ही याला खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

Web Title: Simple easy but delicious street style egg burger recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Egg
  • egg recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
1

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
2

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
3

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.